माणसाचे मन जाणून घेणारी आज्ञावली

या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश
manual developed to explain human thoughts and mind
माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार करण्यात आली.Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टनः एखाद्याने आपल्या मनातली गोष्ट ओळखली तर आपण त्याला मनकवडा म्हणतो खरे, पण तो केवळ योगायोग असतो. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतून आलेले संदेश गोळा करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग वैज्ञानिकांनी यशस्वी केलेला असून, त्यात एका भारतीय वैज्ञानिकाचा समावेश आहे. या प्रयोगात माणसाच्या मनातील विचार ओळखण्यात 96 टक्के यश आले आहे. माणसाचे मन म्हणजे त्याचे विचार सांगणारी आज्ञावली तयार करण्यात आली आहे.

manual developed to explain human thoughts and mind
ZEM New Car : पर्यावरणातील प्रदुषित हवा शोषूण घेणारी कार, जाणून घ्या याबाबत अधिक

वॉशिंग्टन विद्यापीठातील मेंदूवैज्ञानिक राजेश राव यांनी सांगितले की, मानवी मेंदूला वस्तूंचे आकलन कसे होते व दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती वास्तवात काय विचार करीत आहे हे संगणकाद्वारे कसे सांगता येईल हे आमचे दोन उद्देश होते. वैद्यकीयद़ृष्ट्या तुम्ही आमचे निष्कर्ष हे सकारात्मक कारणासाठी वापरू शकता. जे लोक विकलांग आहेत त्यांना मेंदूचे संदेश अवयवांपर्यंत न पोहोचल्याने हालचाली करता येत नाहीत. ही अडचण आमच्या संशोधनातून दूर होऊ शकते. फेफरे किंवा अपस्माराचा विकार असलेल्या सात रुग्णांवर अमेरिकेतील हाबरेव्ह्यू मेडिकल सेंटर येथे प्रयोग करण्यात आला. त्यात प्रत्येकाला अपस्माराचे झटके येत होते. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मेंदूतील कुंभखंड म्हणजे टेम्पोरल लोबमध्ये इलेक्ट्रोड बसवण्यात आले, असे विद्यापीठाचे मेंदू शल्यक्रियातज्ज्ञ जेफ ओजेमन यांनी सांगितले. यात आज्ञावलीने मानवी मेंदूतील संदेशाचे दर सेकंदाला 1000 वेळा विश्लेषण करण्यात आले. आता या आज्ञावलीने इलेक्ट्रोडचे ठिकाण व संदेश यांचीही सांगड घातली. त्या व्यक्तीने प्रत्यक्ष काय पाहिले हे सांगता आले. लोकांच्या प्रतिसादावर आधारित दोन तृतीयांश प्रतिमांवर त्यांना काय विचार आले असतील याचा शोध मेंदूतील संदेशातून घेण्यात आला. एक तृतीयांश प्रतिमा या लोकांना माहिती नसताना त्यांनी त्या वीस मिलिसेकंदात 96 टक्के अचूकतेने ओळखल्या. हे तंत्र ब्रेन मॅपिंगसाठी वापरता येईल व कुठल्या माहितीवर मेंदूतून काय प्रतिसाद येतो हे कळू शकेल, असे राव यांचे म्हणणे आहे. ‘प्लॉस काम्प्युटेशनल बायॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे.

manual developed to explain human thoughts and mind
अंतराळात राहिल्याने माणसाचे वय थांबते?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news