अंतराळात राहिल्याने माणसाचे वय थांबते?

या संशोधनासाठी 12 युनिव्हर्सिटीचे 84 संशोधक काम करीत होते
Does living in space stop people from aging?
या दोन भावांना सुमारे वर्षभर प्रयोग करण्यात आले. Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये अनेक अंतराळवीर अगदी सहा सहा महिन्यांसाठीही राहत असतात. अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये राहून शरीरावर काही परिणाम होत असतातच. मात्र, अंतराळात राहिल्याने अंतराळवीरांचे वय थांबते का ? ते लवकर म्हातारे होत नाहीत का? असेही अनेक लोकांना कुतूहल वाटते. यासाठी एक संशोधन करण्यात आले.

अंतराळात स्कॉट जुळ्या भावापेक्षा दिसत होता तरुण

तुम्ही ‘इंटरस्टेलर’ चित्रपट जर पाहिला असेल किंवा अंतराळातील घडामोडींमध्ये विश्वास असेल, तर हा ख्रिस्टोफर नोलन यांचा चित्रपट जरूर पाहावा. साल 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटात अंतराळातील रहस्ये आणि रेलेव्हिटी महान संशोधक शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्या सापेक्षता वादाचा सिद्धांत दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात स्पेस, टाईम ट्रॅव्हल आणि ग्रॅव्हिटीचे अनेक सिद्धांत दाखविले आहेत. या चित्रपटाच्या नायकाला अंतराळात पाठवितात. ज्यावेळी तो खाली पृथ्वीवर परततो तेव्हा त्याची पृथ्वीवरील मुलगी म्हातारी झालेली असते. त्याचे मात्र वय वाढलेले नसते. त्यामुळे खरंच अंतराळात वय वाढत नाही का, याची पडताळणी करण्यासाठी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात विज्ञान काय म्हणजे ते पाहूयातः साल 2015 रोजी याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी दोन भावांना सुमारे वर्षभर प्रयोग करण्यात आले होते. यासाठी दोन जुळ्या भावांना निवडण्यात आले होते. त्यात एका भावाला एक वर्षभरासाठी स्पेसमध्ये पाठविण्यात आले. आणि दुसरा भाऊ येथेच पृथ्वीवर राहिला. या संशोधनासाठी 12 युनिव्हर्सिटीचे 84 संशोधक काम करीत होते. साल 2019 मध्ये संशोधनाचे निष्कर्ष जेव्हा सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दोन्ही जुळ्या भावांपैकी एक स्कॉट केली जेव्हा अंतराळ स्थानकात पोहोचले तेव्हा त्याच्या शरीरातील एक हजाराहून अधिक जीन्समध्ये बदल झाला. या एक हजार बदलांपैकी एक सर्वात मोठा बदल म्हणजे टेलोमेयरमध्ये पाहायला मिळाला. टेलोमेयर हे क्रोमोझोमच्या म्हणजेच गुणसूत्रांच्या मुळांमधील एक प्रोटिन असते. पृथ्वीवरील माणसाच्या शरीरातील टेलोमेयरमुळे काळानुरूप डीएनए लहान होऊ लागतो. यामुळे पेशीत म्हातारपणाचे बदल दिसतात. त्यामुळे माणसात वृद्धत्वाचे बदल घडतात. परंतु, स्कॉट याच्या शरीरात असा काही बदल झाला नाही. तो त्याच वेळी पृथ्वीवरील त्यांचा जुळा भाऊ मार्क केली यांच्या तुलनेत तरुण दिसू लागला. स्कॉटच्या जीन्समध्ये सुमारे 91.3 टक्के बदल दिसला. परंतु हे बदल जेवढ्या वेगाने झाले होते, तितक्या वेगानेच ते पृथ्वीवर येताच पुन्हा नष्ट झाले. सहा महिन्यांत स्कॉट पुन्हा आपल्या भावासारखाच दिसू लागला. अंतराळात स्कॉट आपल्या जुळ्या भावापेक्षा तरुण दिसत होता. तोच स्कॉटनंतर पृथ्वीवर आल्यानंतर सहा महिन्यांतच भावासारखाच दिसू लागला आणि काही काळानंतर त्यांचा डीएनए देखील पुन्हा नॉर्मल पृथ्वीवरील माणसांसारखा दिसू लागला!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news