लाखो स्वारोव्हस्की स्फटिकांनी सजवलेली लक्झरी कार तुम्ही पाहिली का? रस्त्यावरून जाताना चमकते हिऱ्यासारखी!

Luxury Car : मर्सिडीज, लॅम्बोर्गिनीनंतर आता मॉस्कोमध्ये नवा अद्भूत प्रयोग
Luxury Car
स्वारोव्हस्की स्फटिकांनी सजवलेली लक्झरी कार
Published on
Updated on

मॉस्को : वाहनप्रेमी आणि कार कस्टमायझेशनच्या विश्वात नेहमीच काहीतरी अद्भूत आणि अवाढव्य प्रयोग होत असतात. असाच प्रयोग गाडीला स्वारोव्हस्की स्फटिकांनी सजवण्याचाही झालेला आहे. एका प्रसिद्ध लक्झरी कारला लाखो ‘स्वारोव्हस्की’ स्फटिकांनी सजवण्यात आले असून, ही कार रस्त्यावरून जाताना हिऱ्यासारखी चमकते.

या कारला हे अनोखे रूप देण्यासाठी कस्टमायझेशन तज्ज्ञांना आणि कारागिरांना शेकडो तासांचे अथक परिश्रम घ्यावे लागले आहेत. कारच्या प्रत्येक भागावर, बोनेटपासून ते अगदी बंपर आणि साइड पॅनल्सपर्यंत, अत्यंत सूक्ष्मतेने हे मौल्यवान स्फटिक हाताने चिकटवण्यात आले आहेत. लख्ख प्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटस्‌खाली या कारची चमक पाहण्यासारखी असते. कारची ही चमक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. अनेकांनी याला ‘चाकांवरचा हिरा’ अशी उपमा दिली आहे, तर काही वाहनप्रेमींनी या अनोख्या कल्पनेचे कौतुक केले आहे.

कार दिसायला जितकी आकर्षक आणि वैभवशाली आहे, तितकीच तिची देखभाल करणे कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते या कारला सामान्य कारप्रमाणे धुता येत नाही, त्यासाठी विशेष तंत्राचा वापर करावा लागतो. रस्त्यावरील धूळ, माती आणि हवामानातील बदल यांपासून या स्फटिकांचे रक्षण करणे हे मोठे आव्हान असते.

सुरक्षेच्या कारणास्तव ही कार सामान्य रस्त्यांवर फिरवणे अत्यंत जोखमीचे आहे. यापूर्वीही जगभरात मर्सिडीज-बेंझ, लॅम्बोर्गिनी आणि रोल्स रॉयस यांसारख्या महागड्या गाड्यांवर स्वारोव्हस्की स्फटिक बसवण्याचे प्रयोग झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news