Lord Jagannath Portrait | ७०० ग्रॅम मेंदीपासून साकारली भगवान जगन्नाथांची प्रतिमा

‘बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’ मध्ये नोंद!
Lord Jagannath Portrait |
Lord Jagannath Portrait | ७०० ग्रॅम मेंदीपासून साकारली भगवान जगन्नाथांची प्रतिमा
Published on
Updated on

नीमच : मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील जावद येथील प्रसिद्ध मेंदी आर्टिस्ट अंजली चौहान हिने आपल्या अनोख्या कलागुणांच्या जोरावर ‘बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’मध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांत नोंदवले आहे. अंजलीने ५ बाय ५ फुटांच्या कॅनव्हासवर भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलराम यांचे अत्यंत आकर्षक आणि भव्य पेंटिंग साकारले आहे. २५ चौरस फुटांची ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी तिला तब्बल १० दिवसांचा कालावधी लागला आणि यासाठी एकूण ७०० ग्रॅम मेंदीचा वापर करण्यात आला. हे पेंटिंग दीर्घकाळ टिकावे म्हणून मेंदीसोबत फेव्हिकॉल आणि साखरेचाही विशेष वापर करण्यात आला आहे.

या जागतिक विक्रम रचणाऱ्या पेंटिंगचे औपचारिक अनावरण नीमच येथील इस्कॉन मंदिरात करण्यात आले. याप्रसंगी ‘बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌’ संस्थेच्या वतीने अंजलीला अधिकृत प्रमाणपत्र, पदक आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सामान्यतः हातांवर मेंदी काढताना अवघी २० ते ३० ग्रॅम मेंदी लागते. मात्र, ५ बाय ५ फुटांच्या या विशाल कॅनव्हासवर चित्र काढण्यासाठी तब्बल ७०० ग्रॅम मेंदी लागली. चित्र कोरडे झाल्यानंतर मेंदीचे पापुद्रे बनून ते खराब होऊ नये आणि रंग सर्वत्र एकसमान राहावा, यासाठी मेंदीच्या मिश्रणात साखरेचे प्रमाण वाढवण्यात आले होते.

तसेच हे पेंटिंग सुरक्षित राहण्यासाठी ते छोट्या-छोट्या भागांत पूर्ण करण्यात आली आणि मेंदी वाळताच त्यावर फेव्हिकॉलचा हलका थर (प्रिझर्व्हेटिव्ह कोटिंग) चढवण्यात आला. अंजली गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक मेंदी कलेचे काम करत आहे. सोशल मीडियावर रील्स पाहताना तिला मेंदीचा वापर करून काहीतरी वेगळे आणि मोठ्या कॅनव्हासवर साकारण्याची कल्पना सुचली. यानंतर तिने ५x५ फुटांच्या कॅनव्हासवर १० दिवस दिवस-रात्र कठोर मेहनत घेऊन हे अप्रतिम चित्र पूर्ण केले. वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या टीमने २५ चौरस फूट आकार आणि ७०० ग्रॅम साहित्याचे ऑनलाईन पडताळणी करून हे प्रमाणपत्र जारी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news