Reel Making Accident | रिल बनवण्याच्या नादात मोडले पाय!

Reel Making Accident |
Reel Making Accident | रिल बनवण्याच्या नादात मोडले पाय!
Published on
Updated on

लखनौः सध्या अनेकांना ‘रिल’ नामक भुताने पछाडलेले आहे. काही लोक ‘कन्टेंट क्रिएटर’ म्हणून सोशल मीडियावर काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेंट तयार करून आजकाल काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. परंतु, कन्टेंट क्रिएशनचे हेच वेड कधी कधी जीवघेणे ठरू शकते. नेटकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक काहीतरी विचित्र गोष्टी करतात. याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. सध्या असाच एक कन्टेंट क्रिएटर चांगलाच गोत्यात आला आहे. रिल बवण्याच्या नादात त्याने नदीच्या पाण्यात उडी मारली. परंतु, उडी घेतल्यानंतर आता तो दोन्ही पाय मोडून बसला आहे!

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना उत्तर प्रदेशातील झांसी येथील आहे. या तरुणाने एका पुलावर उभे राहात खाली नदीच्या पाण्यात उडी घेतली; पण नदीमध्ये पाणी कमी असल्याने त्याचे पाय थेट खाली तळाला लागले. यातच त्याचे दोन्ही पाय मोडले. ही घटना घडली तेव्हा त्याचे मित्र मोबाईल हातात घेऊन व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. पाय मोडलेला तरुण आधी पुलावर उभा राहिलेला व्हिडीओत दिसत आहे. त्याने कॅमेऱ्याकडे हात करून थेट ३० फुटांवरून पाण्यात उडी घेतली.

उडी घेताच तो थेट नदीच्या तळाशी गेला. यातच त्याचे दोन्ही पाय मोडले. ही घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या एका पायात दोन रॉड टाकण्यात आले आहेत. तर दुसऱ्या पायावर ऑपरेशन केले जाणार आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिल तयार करण्याच्या नादात, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नको त्या गोष्टी करू नये, स्वत:ला धोक्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news