व्हॅलेन्सिया : रोराईमा पृथ्वीवरील सर्वात जुन्या पर्वतांपैकी एक आहे. दक्षिण अमेरिकेतील टेबलटॉप पर्वत अशी त्याची खास ओळख आहे. या पर्वताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अगदी उंचावरील भाग आश्चर्यकारकपणे अतिशय सपाट आहे. हा पर्वत ब्राझील, गयाना व व्हेनेझुएलाच्या जंक्शनवर आहे.
व्हेनेझुएलाचा मोठा हिस्सा असलेल्या ग्रेट सबानाच्या मैदानावर आकाशात तरंगणार्या बेटासारखा हा पर्वत भासतो. याच पर्वताची काही छायाचित्रे व व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. हा पर्वत पाकैरिमा माऊंटेन रेंजचा भाग अद्भूत संरचना, प्राणी व पृथ्वीवर आणखी कुठेही सापडणार नाहीत, अशा वृक्षसंपदेने वेढला गेला आहे, असे यातील एका पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.
रोराईमाला रोराईमा या नावानेही ओळखले जाते. या पर्वताचे छायाचित्र अतिशय अद्भत मानले जाते. जिओलॉजी सायन्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हा पर्वत दक्षिणपूर्व व्हेनेझुएलाच्या कनैमा नॅशनल पार्कमध्ये स्थित असून त्याचा विस्तार ब्राझील व गयानातील क्षेत्रात देखील आहे. हा पर्वत 2810 मीटर (9219 फूट) उंच आहे आणि साहजिकच तो अभ्यासकांमध्ये विशेष आकर्षण केंद्र ठरत आला आहे.