Unique Marriage Tradition | ‘इथे’ तरुणी गच्चीतून चेंडू टाकतात, जो झेलेल तो होतो पती !

Unique Marriage Tradition |
Unique Marriage Tradition | ‘इथे’ तरुणी गच्चीतून चेंडू टाकतात, जो झेलेल तो होतो पती !
Published on
Updated on

बीजिंग : जगभरातील काही समुदायांमध्ये वधू वराची निवड करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुठे वर एखादा अचाट पराक्रम करुन दाखवतो त्यानंतर वधू त्याला पसंद करते. मात्र एका देशात महिला बाल्कनीत उभे राहून एक चेंडू खाली उभ्या असलेल्या तरुणांच्या दिशेने फेकतात. त्यानंतर जो तरुण हा चेंडू अलगद झेलतो त्याला ती वधू आपला भावी वर म्हणून पसंद करते. ही प्राचीन वर निवडण्याची परंपरा चीनमधील एका आदिवासी समुदायात आहे. मात्र, सध्या बाल्कनीतून चेंडू फेकून कोणा अनोळखी तरुणाला पती निवडण्याची प्रथा आला पाळली जात नाही. आता सर्वकाही आधीच ठरलेले असते.

दक्षिण चीनच्या गुंआंग्शी भागात राहणारे झुआंग समुदायात हा चेंडू प्रेमाची कबुली देण्याची एक पारंपारिक पद्धत आहे. यात एकमेकांना पसंद करणारे तरुण-तरुणी एकमेकांकडे नेम धरुन चेंडू फेकतात. जुन्या चीनी कादंबरी आणि पीरियड ड्रामामध्ये चेंडूद्वारे पती निवडण्याची प्रथा अनेकदा पाहायला मिळाली आहे. सोळाव्या शतकात लिहिलेल्या प्रसिद्ध कादंबरी ‘जर्नी टू द वेस्ट’मध्ये देखील हा वर-वधू निवडीचा प्रसंग चितारला आहे.

या कादंबरीतील मुख्य पात्र श्वेनजांगचे वडील त्याच्या आईची निवड अशाच प्रकारे चेंडू फेकून करतात. या घटनेद्वारे संपूर्ण कहानी दाखवली आहे. याच प्रकारे १९८९ चा प्रसिद्ध चीनी टीव्ही ड्रामा ‘माय फेअर प्रिन्सेस ‘ मध्ये एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी अशा प्रकारे वराची निवड करताना दाखवली आहे. या कहानीत तिचे वडील लग्नाला विरोध करतात. कारण मुलीचा चेंडू एक गरीब मुलगा झेलतो. अशा कथा अनेकदा चित्रपटात, मालिकेत आणि साहित्यात दाखवण्यात आल्या आहेत. दक्षिण चीनमध्ये गुआंग्शी झुआंग स्वायत्त क्षेत्रात राहणाऱ्या झुआंग समुदायात अशी चेंडू फेकण्याची परंपरा लोकप्रिय होती.

झुआंग समुदायाची संख्या गुआंग्शीची लोकसंख्येच्या ३० टक्क्यांहून अधिक होती. येथे तरुण आणि तरुणी या चेंडूंचा वापर एकमेकांच्या प्रति प्रेम जाहीर करण्यासाठी करायचे. तिसऱ्या चंद्र महिन्याच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या पारंपारिक उत्सवात तरुण मोठ्या संख्येने जमा व्हायचे. येथे गाणी म्हटली जायची आणि तरुण-तरुणी एकमेकांना प्रेमाची मागणी घालायचे. जर दोन जोडपी एकमेकांना पसंद करत असतील तर ते एकमेकांकडे चेंडू फेकायचे.अनेकदा चेंडू सोबत एक गिफ्ट देखील बांधले जायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news