मेंदूचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यास वाढतो नैराश्याचा धोका

नैराश्याचा धोका
नैराश्याचा धोका
Published on
Updated on

न्यूयॉर्क : मेंदूचा पृष्ठभाग गुळगुळीत किंवा सपाट असेल तर डिप्रेशन म्हणजेच नैराश्य येण्याचा धोका अधिक असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. एका नव्या संशोधनात दिसून आले की तुलनेने गुळगुळीत अशा मेंदूच्या पृष्ठभागामुळे 'मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर' (एमडीडी) विकसित होऊ शकतो.

मेंदूच्या बाह्य आवरणाला 'सेरेब्रल कॉर्टेक्स' असे म्हटले जाते. ते 'गायरी' नावाच्या पॅटर्नमध्ये दुमडलेले असतात. ज्या प्रक्रियेने या वळ्या किंवा सुरकुत्या निर्माण होतात तिला 'गायरीफिकेशन' असे म्हटले जाते. गर्भावस्थेच्या दुसर्‍या टप्प्यात ही प्रक्रिया सुरू होते आणि जन्मानंतरही सुरू राहते. यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनांमधूनही गायरीफिकेशन आणि एमडीडीमध्ये संबंध असल्याचे दिसून आले होते. कॉर्टेक्सच्या पृष्ठभागावरील सुरुकत्यायुक्त किंवा तुलनेने सपाट पृष्ठभागाचे प्रमाण नैराश्याशी संबंधित असू शकते.

'लोकल गायरीफिकेशन इंडेक्स' (एलजीआय) नावाच्या पद्धतीने त्यांचे मोजमाप घेतले जाते. संशोधकांनी 400 पेक्षा अधिक ब्रेन स्कॅन्सचे 'एमडीडी'शी विश्लेषण केले आणि त्याची तुलना अशी स्थिती नसलेल्या लोकांच्या मेंदूशी केली. त्यामधून असे दिसून आले की 'एमडीडी' असलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये तुलनेने कमी वळ्या किंवा सुरकुत्या होत्या. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायकॉलॉजिकल मेडिसिन' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news