चक्क टोमॅटो घालून बनवले आईस्क्रीम!

चक्क टोमॅटो घालून बनवले आईस्क्रीम!
Published on
Updated on

नवी दिल्ली : हल्ली 'फ्युजन'च्या नावाखाली कसले पदार्थ पाहायला मिळतील हे काही सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. आता असाच आणखी एक विचित्र कॉम्बिनेशनचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये चक्क टोमॅटो टाकून आईस्क्रीम बनवली जातेय.

आईस्क्रीम बर्‍याच लोकांना आवडते. तुम्ही अनेक फ्लेवरची आईस्क्रीम पाहिली असेल आणि खाल्लीही असेल; मात्र कधी टोमॅटोची आईस्क्रीम खाल्लीय का? सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विक्रेता टोमॅटोची आईस्क्रीम बनवताना दिसतोय. ही बनवण्याची पद्धत पाहून तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची इच्छाच उडेल. असं काहीही टाकून आजकाल लोक पदार्थ बनवतात. आईस्क्रीमच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. विक्रेता टोमॅटोची आईस्क्रीम बनवत आहे.

तो टोमॅटो कापून त्यामध्ये दूध मिक्स करून त्याला थंड पॅनवर टाकतो. त्यानंतर दोन्ही चांगलं मिक्स करून पॅनवर ते फ्रीज होतं आणि त्याची आईस्क्रीम बनते आणि अशा प्रकारे टोमॅटो आईस्क्रीम तयार होते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर समोर येताच भरपूर कमेंट पाहायला मिळाल्या. लोकांनी अशा विचित्र फ्युजनसाठी संताप व्यक्त केलाय. विक्रेते ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी कधी कशात काय टाकतील सांगू शकत नाही. असे अनेक विचित्र फूड सोशल मीडियावर ट्रेंड होतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news