वॉशिंग्टन : आपल्याकडे एकेकाळी काही लोकांच्या द़ृष्टीने हसणे किंवा विनोद ही थिल्लर बाब समजली जात असे. मात्र, हास्यविनोद, हसणे या गोष्टीही आरोग्यासाठी लाभदायकच आहेत. यामुळे होणार्या प्रमुख परिणामांमध्ये तणाव घटणे हा आहे. हास्यविनोदामुळे रोगप्रतिकारक क्षमतेतही वाढ होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मनोचिकित्सक व स्टँडअप कॉमेडियन केट निकोल्स म्हणाल्या, तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे जास्त हसू येते हे शोधून काढा. लाफ्टर शोमध्ये जा, हसवणार्या लोकांच्या सहवासात जा किंवा पसंतीचा कॉमेडी शो पाहा. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील हास्याच्या मिम्स व व्हिडीओला सेव्ह करा आणि गरज भासेल तेव्हा तो पाहा. पेपरडाईन युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. स्टीव्हन सल्टेनॉफ 40 वर्षांपासून ह्यूमर पॉवरच्या सहाय्याने लोकांना मदत करत आहेत. त्यांनी सांगितले, निराश असताना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवणार्या क्षणांना पुन्हा आठवा. हसवणार्या क्षणांची कल्पना मेडिटेशनसारखी असते.
यातून तुमचा मूड चांगला होतो. 'द हिलिंग पॉवर ऑफ ह्यूमर'चे लेखक अॅलन क्लेन म्हणाले, चेहर्यांवर हास्य खुलवणारी एक गोष्ट दिवसभरात जरूर करायची आहे. असे दररोज सकाळी ठरवा. यातून अनपेक्षित ठिकाणांहून हास्य नक्की मिळेल. तुम्ही जास्त हसू लागाल. कॉमेडी क्लास लावणेही फायद्याचे ठरू शकते. कॉमेडियन निकोल म्हणाल्या, भलेही तुम्ही स्वत:ला विनोदी मानत नसले तरी बदलाच्या दिशेने पाऊल पडू शकते. निकोलने महाविद्यालयीन जीवनात कंटाळवाणेपणा दूर करण्यासाठी क्लास सुरू केला होता. आज जगभरात त्यांचे कार्यक्रम होतात.