ऑस्ट्रेलिया खंडात 65 हजार वर्षांपूर्वीही होता माणूस!

येथे राहणारे मानवाचे पूर्वज हे अवजारे बनविण्यातदेखील कुशल असल्याचे आढळले
Humans first settled in Australia as early as 65000 years ago
ऑस्ट्रेलिया खंडात 65 हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे सापडले.Pudhari Photo
Published on
Updated on

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया खंडात 65 हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मिळालेले आहेत. या शोधाने आधुनिक मानवाने आफ्रिकेतून स्थलांतराला सुरुवात केल्याच्या ज्ञात इतिहासाला बदलले आहे. ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेकडील प्राचीन काकाडूतील जाबिलुका येथील खाणींच्या पट्ट्यामध्ये पुरातत्त्व उत्खननात ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीचे वास्तव्य येथे किमान 65 हजार वर्षांपासून असल्याचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना आढळून आले. त्याप्रमाणे येथे राहणारे मानवाचे पूर्वज हे अवजारे बनविण्यातदेखील कुशल असल्याचे आढळले. याआधी समजल्या जाणार्‍या काळाच्या 18 हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे ऑस्टेलियात वास्तव्य होते, असे आढळून आले.

तीन हजार वर्षांपूर्वीही होत होती कांद्याची शेती

या शोधामुळे पुरातत्त्व क्षेत्रामध्ये कुतूहल निर्माण झाले. या संशोधनाची समीक्षा प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केली असून, ती ‘नेचर’ या प्रतिष्ठित विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणारा मानव हा त्या काळातील अत्याधुनिक अवजारे बनवत असल्याचे संशोधनादरम्यान आढळलेल्या अवजारांवरून सिद्ध होते. अशा प्रकारच्या अवजारांची निर्मिती त्यानंतर 20 हजार वर्षांनी झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. संशोधनात आम्हाला चांगल्या प्रकारे जतन झालेल्या कुर्‍हाडी आढळल्या, असे पुरातत्त्व संशोधक व क्विन्सलँड विद्यापीठाचे प्राध्यापक ख्रिस क्लार्कसन यांनी सांगितले. या शोधामुळे आधुनिक मानव हा आफ्रिका खंडातूनच स्थलांतरित झाला होता, या संकल्पनेला तडा गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news