माणूस किती कडक ऊन सहन करू शकतो?

माणूस किती कडक ऊन सहन करू शकतो?
Published on: 
Updated on: 

लंडन : जगभरातील अनेक भागात हवामान बदलामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक लोकांना हा उन्हाळा असह्य झाला आहे. देशातील अनेक भागात उष्णतेने रेकॉर्ड मोडले आहे. उष्णतेच्या झळांनी दिवसाच नाही, तर रात्रीही घरातून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे मनुष्याचे शरीर किती तापमान सहन करू शकते? असा प्रश्न तुमच्यापण मनात आला असेलच. काय आहे त्याचे उत्तर? शास्त्रज्ञांच्या मते, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे 98.9 डिग्री फॉरेनहाईट असते. ते आपल्या जवळपासच्या वातावरणात म्हणजे बाहेरील तापमानाच्या 37 डिग्री सेल्सिअस इतके असते. विज्ञानाच्या मते, मानवीय शरीरातील रक्त उष्ण असते. मनुष्य 42 डिग्री सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकतो.

मनुष्याच्या शरीरात एक खास तंत्र 'होमियोस्टॅसिस' असते. ते मनुष्याला या तापमानातपण सुरक्षित ठेवते. 42 डिग्री तापमानात कोणताही मनुष्य जिवंत राहू शकतो, तर यापेक्षा अधिकचे तापमान मनुष्याच्या शरीरासाठी नुकसानदायक असते. 'लंडन स्कूल ऑफ हायजीन'च्या एका अहवालानुसार, 2050 पर्यंत उष्णतेने होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात 257 टक्क्यांपर्यंत वृद्धी होऊ शकते. विज्ञानानुसार, मनुष्य 35 ते 37 डिग्री तापमान कोणत्याही त्रासाशिवाय सहन करू शकतो. पण हेच तापमान 40 डिग्रीवर पोहचते, तेव्हा लोकांना अडचण येते.

याविषयीच्या अनेक संशोधनानुसार, मनुष्यासाठी 50 डिग्रीपेक्षा अधिकचे तापमान सहन करणे एकदम अवघड असते. जर तापमान यापेक्षा अधिक वाढले, तर ते जीवाला धोकादायक असते. 'मेडिकल जर्नल लँसेट'च्या एका अहवालानुसार, वर्ष 2000-04 आणि 2017-2021 या दरम्यान 8 वर्षांत भारतात भयंकर उष्णतेची लाट आली. तसेच उष्माघातामुळे मरणार्‍यांची संख्या 55 टक्क्यांनी वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञानुसार, जर पारा 45 डिग्री असेल तर चक्कर येणे, बेशुद्धी, अस्वस्थता यांसारख्या तक्रारी वाढतात. त्यामुळे रक्तदाब कमी होण्याची भीती वाढते. जर तापमान 48 ते 50डिग्री वा त्यापेक्षा अधिक असेल, तर मनुष्याचे शरीर कार्य करणे थांबविते. त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news