Airplane Fuel Storage : विमानाचे पंख पातळ असूनही हजारो लिटर इंधन कसे मावते? जाणून घ्या

हवेतील हवेचा दाब आणि इंधनाचे वजन यांचा कसा साधला जातो ताळमेळ?
Airplane Fuel Storage
विमानाचे पंख पातळ असूनही हजारो लिटर इंधन कसे मावते?
Published on
Updated on

लंडनः आपण सर्वांनीच आकाशात किंवा विमानतळावर अजस्र विमाने उडताना पाहिली आहेत. विमान आकाराने किती मोठे आणि जड असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, कधी तुम्ही विमानांच्या पंखांकडे बारकाईने पाहिले आहे का? विमानाचे पंख अतिशय पातळ दिसतात. त्यामुळे ‌‘इतके पातळ पंख एवढ्या मोठ्या विमानाचे वजन हवेत कसे पेलत असतील?‌’ असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण, याहूनही रंजक आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे, याच पातळ पंखांच्या आत विमानाचे हजारो लिटर तेल (इंधन/फ्यूल) साठवलेले असते. वरून सपाट आणि एखाद्या पत्र्यासारखे दिसणारे हे पंख एवढे वजन कसे काय झेलतात आणि त्यांच्यात इंधन कसे ठेवले जाते? यामागील रंजक गुपिते जाणून घ्या.

आपल्याला बाहेरून विमानाचे पंख अगदी सपाट आणि ठोस वाटतात; पण हा केवळ आपल्या डोळ्यांचा भम आहे! प्रत्यक्षात हे पंख आतून पूर्णपणे पोकळ असतात, जणू काही एखादी मोठी रिकामी बाटली किंवा मोठा डबा. विमान बनवणारे अभियंते (इंजिनिअर्स) अत्यंत हुशार पद्धतीने याची रचना करतात. हे पंख विमानाला हवेत वर उचलण्याचे (लिफ्ट देण्याचे) काम तर करतातच; पण त्याचसोबत इंधन साठवण्यासाठी एक उत्तम ‌‘टँक‌’ (टाकी) म्हणूनही काम करतात. पंखांच्या आत अतिशय मजबूत आणि खास धातूचे सांगाडे असतात, जे त्यांना प्रचंड ताकद देतात. हे आपण पुढील तीन भागांच्या मदतीने समजू शकतो

स्पार ( Spar) : पंखांच्या आत विमानाला समांतर जाणाऱ्या दोन ते तीन लांब आणि अत्यंत मजबूत सळ्या असतात, ज्यांना ‌‘स्पार‌’ म्हणतात. हे विमानाचे कणा म्हणून काम करतात. विमानाला खरी ताकद याच भागामुळे मिळते आणि संपूर्ण विमानाचे वजन पेलण्यास हे मदत करतात. रिब ( Rib): या मुख्य सळ्यांच्या (स्पार्सच्या) दरम्यान छोट्या-छोट्या बरगड्यांसारखी रचना असते, ज्यांना ‌‘रिब‌’ म्हणतात. हे पंखांना योग्य आकार देतात आणि त्यांना अधिक मजबूत बनवतात.

स्किन ( Skin) : पंखांच्या बाहेरील बाजूस असलेल्या धातूच्या पातळ थराला ‌‘स्किन‌’ म्हटले जाते. हे सर्व भाग एकत्र येऊन विमानाला एक मजबूत आणि आतून पोकळ रचना देतात. पंखांच्या आत ‌‘स्पार‌’ आणि ‌‘रिब‌’ यांच्यामध्ये जी रिकामी जागा उरते, तिचे रूपांतर छोट्या-छोट्या कप्प्यांमध्ये (कंपार्टमेंटस्‌‍) केले जाते. हे कप्पे पूर्णपणे ‌‘सील‌’ म्हणजेच हवाबंद असतात, जेणेकरून इंधन अजिबात गळणार नाही. विशेष म्हणजे, पंखांच्या आत वेगळी प्लास्टिक किंवा धातूची टाकी ठेवलेली नसते, तर पंखांचा स्वतःचा पोकळ सांगाडाच इंधनाची टाकी म्हणून वापरला जातो. जसे आपल्या घराच्या छतावर पाण्याची टाकी असते, अगदी तसेच विमानाचे पंख त्याच्या इंधनासाठी मुख्य टाकीचे काम करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news