उंची 7 फूट, वजन 115 किलो; छोटा गजराज नव्हे, हा तर कुत्रा

उंची 7 फूट, वजन 115 किलो; छोटा गजराज नव्हे, हा तर कुत्रा
Published on
Updated on

यॉर्कशायर : कुत्रा पाळणे अनेकांना आवडते, तर अनेकांना त्याचा तिटकारा असतो. एक खरे की, हा प्राणी घराची देखभाल अगदी मनापासून करतो आणि त्यामुळे तो कुटुंबाचाच एक सदस्य होऊन जातो. सध्या इंग्लंडमधील यॉर्कशायरचे डिलन शॉ हे श्वानप्रेमी चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, हा कुत्रा की छोटा हत्ती, असा प्रश्न सहज कुणालाही पडेल.

कुत्र्याचे नाव 'अबू' असून, त्याची उंची आहे 7 फूट दोन इंच अन् वजन आहे तब्बल 115 किलो. म्हणजेच छोटा हत्ती म्हटले तरी हरकत नाही. डिलन यांनी असा दावा केला आहे की, युनायटेड किंगडममधील हा सर्वात मोठा कुत्रा आहे. अर्थात, त्याचे पालनपोषण करणे ही सामान्यांच्या आवाक्यातील गोष्ट नाही. कारण, त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.

डिलन यांनी सांगितले आहे की, या कुत्र्याला चिकन भयंकर प्रिय आहे. वर्षभरासाठी मला सुमारे चार लाख रुपयांची तरतूद त्याकरिता करावी लागते. रोज तो तीन किलो मटण फस्त करतो. यामध्ये अख्खा कोंबडा, तीन मोठे मासे, दोन अंडी आणि त्याखेरीज डॉग फूडचा समावेश आहे. पाहताक्षणीच कोणालाही धडकी भरावी, असा भासणारा हा कुत्रा वास्तवात अत्यंत प्रेमळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news