

आपल्या संस्कृतीमध्ये अनेक पदार्थांचा विविध सणांमध्ये खुबीने वापर केलेला आहे. मकर संक्रांतीला आपण तिळगूळ देत-घेत असतो. हा तीळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतो असे संशोधकांनी म्हटले आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजाने समृद्ध असे हे तीळ आरोग्यासाठी वरदान आहे, असे तज्ज्ञ सांगतात. तीळ पांढर्या आणि काळ्या दोन्ही रंगांचे असतात. हे दोन्ही प्रकारचे तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तिळामध्ये भरपूर फायबर देखील आढळते, जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. तिळाचे हे काही लाभ…
कोलेस्टेरॉल नियंत्रित करते
तीळ हेल्दी फॅटस्चा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि चयापचय सुधारते. या बियांमध्ये मेथिओनाइन देखील असते, जे यकृत निरोगी ठेवण्यासोबतच कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात ठेवते. एका संशोधनानुसार, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्टेरॉल खूप कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. दोन महिने रोज 40 ग्रॅम तीळ खाल्ल्यास वाईट कोलेस्टेरॉलची पातळी खूप कमी होते.
यकृत निरोगी ठेवते :
तिळामध्ये मेथिओनाइन देखील असते, जे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. तिळाच्या बियांमध्ये आढळणारा आणखी एक घटक म्हणजे ट्रिप्टोफॅन (ज्याला शांत करणारे पोषक म्हणून देखील ओळखले जाते). हे शांत झोपेला प्रोत्साहन देते.
कर्करोग रोधक :
आहारतज्ज्ञांच्या मते, तिळामध्ये अँटिआक्सिडंट आढळते, जे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते. विशेषत: फुफ्फुसाचा, पोटाचा, रक्ताचा कर्करोग इत्यादींमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे.
हाडे मजबूत होतील :
आहारतज्ज्ञांच्या मते, तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मँगेनिज आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तिळामध्ये आहारातील प्रथिने आणि अमिनो अॅसिड असतात. यामुळे स्नायू मजबूत होतात. तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
जळजळीवर फायदेशीर :
तीळ जळजळीशी लढण्यासाठी खूप गुणकारी आहे. कारण तिळामध्ये दाहकविरोधी असते. यामुळे तिळात सूज कमी करण्याची क्षमता असते. यासोबतच हृदय आणि किडनीच्या आजाराचा धोकाही कमी होतो.
त्वचेसाठी फायदेशीर :
तीळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला आवश्यक पोषण प्रदान करते. तीळ नैसर्गिकरीत्या टाळूच्या खाली तेल तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.