कांद्यामध्ये असतात अनेक लाभदायक गुण

कांदा खाल्ल्याने होणारे ‘हे’ आहेत फायदे
Health Benefits of Onions
कांद्यामध्ये अनेक लाभदायक गुण असतात. Pudhari File Photo

नवी दिल्ली : कांद्याचा वापर विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कांदा केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्याच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे देखील होतात. कांदा उष्माघातापासून देखील आपला बचाव करू शकतो.

Health Benefits of Onions
मेंदूच्या आरोग्यासाठी ‘हे’ मासे गुणकारी

कांदा सेवनाने आरोग्यासाठी हाेणारे फायदे

आहारतज्ज्ञ सांगतात की, कांदा उष्णतेपासून दिलासा देतो. कांद्यामध्ये नैसर्गिक कुलिंग गुणधर्म असतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूरअसते, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम देखील आढळतात, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइटस्चे संतुलन राखण्यास मदत करतात. कांद्यात आढळणारे क्वेर्सेटिन आणि सल्फर हे घटक शरीराला थंडावा देतात. कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइडस्, पॉलिफेनॉल आणि सल्फर संयुगे यासारखी फायटोकेमिकल्स देखील आढळतात. हे घटक कांद्याचे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म वाढवतात. शरीराला सामान्य तापमान राखण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव पडतो. कांद्यामध्ये असलेले एलिल सल्फाइड्स रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्त परिसंचरण सुधारते. कांदा पाचक एंझाइम सक्रिय करून पोटातील गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून बचाव करतो. कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात. हे आपल्या आतड्यांमध्ये राहणार्‍या चांगल्या जीवाणूंचे पोषण करतात आणि हे जीवाणू पचनासाठी आवश्यक असलेले लहान फॅटी अ‍ॅसिड तयार करतात. कांद्यामध्ये आढळणारे क्रोमियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात कांद्याचा समावेश जरूर करा. कांद्यामुळे लघवी तयार होण्याची प्रक्रिया वाढते. शरीरातील खराब पदार्थ सहज बाहेर काढता येतात. कांद्यामुळे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर वाढण्यासही मदत मिळते.

अननस आरोग्यासाठी फायदेशीर | पुढारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news