अननस आरोग्यासाठी फायदेशीर | पुढारी

पुढारी ऑनलाईन

अननस हे फळ कापण्यास जितके अवघड असते तितकेच ते चविष्टही असते. अननस आंबट गोड असून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अननसात फॉस्फरस, पोटॅशिअम, ए आणि सी जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, अँटीऑक्सिडंट्स असतात. या सर्व घटकांमुळे हाडे मजबूत होऊन वजन कमी होण्यासही मदत होते. अननस खाल्ल्यास वेगवेगळ्या आजारापासून आराम मिळतो. त्यामुळे जाणून घेऊया अननसाचे फायदे… 

१) अननसात असणारे ब्रोमिलेन सर्दी, खोकला, घशाची सूज, घशाची खवखव आणि सांधेदुखीवरही फायदेशीर असते. पचन क्रियेसाठीही अननस उपयुक्त आहे. अननसाच्या रसात बेहडा, मुलेठी आणि खडीसाखर मिसळून सेवन केल्यास खोकला आणि दमा निघून जाण्यास मदत होते.

२) अननस हे नैसर्गिक औषधी असून रोजच अननसाच्या दोन-तीन तुकड्यांचे सेवन केल्यास शरीरावरील सूज कमी होते. ज्या लोकांना मूतखड्याचा त्रास होत असेल त्यांनी रोजच एक ग्लास अननसाचा रसाचे सेवन करावे.

३) अननस डोळ्यांच्या आरोग्यासही उपयुक्त ठरतो. संशोधनानुसार दिवसातून तीनवेळा काही प्रमाणात अननसाचे सेवन केल्यास वाढत्या वयानुसार नजर कमी होण्याचा धोका कमी होतो. ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांच्या मते अननसामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

४) एक कप अननसाच्या रसाचे सेवन केल्यास दिवसभरासाठी लागणारे मग्नेशिअमची (७३ टक्के) ऊर्जा शरीराला मिळाते. अननसाचा रस शरीरातील हाडांना मजबूत करण्यासाठीही उपयुक्त आहे.  

५) मुतखडा 

 एखाद्या व्यक्तीला मुतखडा झाला असेल तर अननसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. त्याशिवाय काही लोकांमध्ये मुतखडा होत नाही, पण मूत्रपिंडामध्ये वेदना होत असतात. त्यांच्यासाठीही अननसाच्या रसाचा खूप फायदा होतो. 

६) सांधेदुखी   

अननसामध्ये भरपूर प्रमाणात मँगेनीज असल्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर रोज अननसाचे सेवन केल्यास स्नायू आणि सांध्यांमध्ये होणारी चमक तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. वातावरण बदलामुळेही सांध्याना सूज येते, यावरही अननसाचा रस फायदेशीर ठरत असतो.

logo
Pudhari News
pudhari.news