GTA 6 Gameplay Leak | GTA 6 चा गेमप्ले ऑनलाईन लीक

GTA 6 Gameplay Leak |
GTA 6 Gameplay Leak | GTA 6 चा गेमप्ले ऑनलाईन लीक
Published on
Updated on

रोम : जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (GTA 6) या गेमचा शेवटचा ट्रेलर रीलिज होऊन १८ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. रॉकस्टार कंपनीने नेटफ्लिक्सवरील एका विशेष कार्यक्रमाद्वारे या गेमची अधिकृत झलक दाखवण्याची घोषणा केली होती. मात्र, या अधिकृत सादरीकरणापूर्वीच इंटरनेटवर गेमचे प्रत्यक्ष फुटेज लीक झाल्याने गेमिंग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

लीक झालेले व्हिडीओ अस्सल असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यावर रॉकस्टारची मूळ कंपनी ‘टेक-टू इंटरॲक्टिव्ह’ने न्यूयॉर्कच्या न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली आहे. मायक्रोसॉफ्टचे ‘गिटहब’ आणि चॅट ॲप ‘डिस्कॉर्ड’वरून हे कॉपीराईट असलेले फुटेज शेअर करणाऱ्या युजर्सची माहिती देण्याची मागणी कंपनीने केली आहे. अनेक खाती आणि व्हिडीओंवर कॉपीराईट कारवाई करून ते तातडीने हटवले जात आहेत.

लीक करणाऱ्या गटाने गेमची डिस्क आवृत्ती (फिजिकल डिस्क) न देण्याच्या कंपनीच्या निर्णयावर टीका करत खेळाडूंच्या हितासाठी हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, फुटेजसोबत क्रिप्टोकरन्सीमध्ये देणग्या मागितल्या जात असल्याने, हा प्रकार निव्वळ पैशांसाठी सुरू असल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘स्टॉप किलिंग गेम्स’ मोहिमेनेही या लीक्सचा निषेध केला आहे.

आयजीएनचे वृत्त संचालक वेस्ली यिन-पूल यांच्या मते, दशकभराच्या हजारो लोकांच्या मेहनतीवर अशा लीक्समुळे पाणी फिरल्यासारखे वाटते. दुसरीकडे, रॉकस्टारचे माजी तांत्रिक संचालक ओबे व्हर्मिज यांच्या मते, या लीक्सचा गेमच्या अंतिम यशावर काहीही परिणाम होणार नाही. रॉकस्टारच्या गोपनीयतेच्या संस्कृतीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता टोकाला पोहोचली आहे. जेव्हा गेम अधिकृतरीत्या प्रत्यक्ष बाजारात येईल, तेव्हा प्रेक्षक हे लीक्स विसरून गेमचा पुरेपूर आनंद घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news