अबुधाबीमध्ये भव्य मंदिराची उभारणी

अबुधाबीमध्ये भव्य मंदिराची उभारणी
Published on
Updated on

दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी शहरात एक भव्य आणि सुंदर मंदिर उभे राहिले आहे. मध्य-पूर्वेतील हे पहिले पारंपरिक हिंदू मंदिर पुढील वर्षी फेब्रुवारीत भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्याच्या उद्घाटनाचा समारंभ हा सर्वात मोठा सद्भावना समारोह असेल असे 'बीएपीएस हिंदू मंदिर'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले. हे स्वामीनारायण संप्रदायाचे मंदिर आहे.

संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की हे मंदिर वैश्विक सद्भावनेचे आध्यात्मिक केंद्र बनेल. भारताची संस्कृती, कला आणि सन्मूल्यांचे हे मंदिर संयुक्त अरब अमिरातीमध्ये दर्शन घडवीत राहील. हे मंदिर एक हजार वर्षे सुस्थितीत राहू शकेल. या मंदिराची उभारणी अबू मुरीखा याठिकाणी होत असून ते आता निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. तब्बल 27 एकर जागेत या मंदिराचा परिसर आहे. 14 फेब्रुवारी 2024 या दिवशी मंदिराचे उद्घाटन केले जाईल. त्यामध्ये केवळ निमंत्रितच सहभागी होतील.

15 फेब्रुवारीला देशातील हिंदू भाविक एका सार्वजनिक सभेच्या माध्यमातून समारोहात सहभागी होतील. त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आधीच नोंदणी करणे गरजेचे आहे. 18 फेब्रुवारी 2024 पासून हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येईल. ऑगस्ट 2015 मध्ये यूएई सरकारने अबुधाबीमध्ये मंदिराच्या उभारणीसाठी जमीन दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news