चक्क धावत्या रेल्वेत झाले लग्न!

चक्क धावत्या रेल्वेत झाले लग्न!

नवी दिल्ली : हौस म्हणून विमानात, हॉट एअर बलूनमध्ये, जहाजाच्या डेकवर लग्न करणारी जोडपी आहेत. मात्र, काही कारणाने अचानक ठरवून चक्क धावत्या रेल्वेत एका जोडप्याने लग्न केल्याचेही उदाहरण आता पाहायला मिळत आहे. डब्यातील इतर प्रवाशांनी यावेळी वर्‍हाडी पाहुण्यांची भूमिका पार पाडली!

या अजब लग्नाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. अन् तो क्षण अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो; पण हे लग्न कपलच काय व्हिडीओ पाहणारा कोणीच विसरू शकणार नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत 55 हजारांपेक्षा अधिक नेटकर्‍यांनी पाहिला असून अनेकांनी या लग्नाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

या कपलच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे ते घरातून पळाले अन् त्यांनी ट्रेनमध्येच लग्न केलं असा अंदाज व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकर्‍यांनी लावला आहे. वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, भांगेत कुंकू भरला आणि दोघांनी एकमेकांना मोगर्‍याचे हार घातले व हे लग्न पार पडले!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news