सोन्याच्या हॉटेलची जगाला अपूर्वाई

सोन्याच्या हॉटेलची जगाला अपूर्वाई
Published on
Updated on

हनोई : प्लॅटिनमसारखे काही धातू सोन्यापेक्षाही महाग असले तरी सोनं ते सोनंच. या 'राजधातू'चे आकर्षण सध्याच्या युगातही जगभर कायम आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सोन्याचा वापर केला जात असतो. व्हिएतनाममधील सोन्याने मढवलेले हॉटेल जगप्रसिद्धच आहे. या हॉटेलची जगभरातील पर्यटकांना अर्थातच मोठी अपूर्वाई वाटते.

या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. जगातील हे पहिले सोन्याचे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये आहे. येथे दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरूम, भांडी आदी सारेच सोन्याचे आहे. या हॉटेलचे नाव डोल्से हनोई गोल्डन लेक असे आहे. या हॉटेलचे गेट ते कॉफीच्या कपापर्यंत सर्व वस्तू सोन्याने मढवलेल्या आहेत. जणू काही हात लावेल ते सोने बनवणार्‍या मिडास राजाचाच हा महाल आहे! हे एक पंचतारांकित हॉटेल असून 25 मजल्याचे आहे. या हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत.

हॉटेलच्या बाहेरील भिंतींवर जवळपास 54 हजार वर्ग फुटांच्या गोल्ड प्लेटेड टाईल्स लावण्यात आल्या आहेत. कोरोना काळानंतर जगभरातील पर्यटक फिरण्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. ख्रिसमस व न्यू इअर सेलिब्रेशनसाठीही अनेक पर्यटक डिसेंबर अखेरीस बाहेर पडतात. अशा अनेक पर्यटकांना हे हॉटेल खुणावते. सोन्याचं हॉटेलमध्ये पर्यटन करण्यास मिमळणे म्हणजे दुधात साखर असल्यासारखं असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. जगातील हे पहिलेच सोन्याचं हॉटेल असल्याने पर्यटकांनी हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news