

बीजिंग ः हल्ली सोन्यासारख्या राजधातूचा आणि हिर्यांसारख्या मौल्यवान रत्नाचा वापर कशासाठी करतील हे काही सांगता येत नाही. दुबईत सोन्याचे कमोड बनवले गेले होते. मात्र चीनमध्ये तर 40 हजार हिरे जडवलेले सोन्याचे कमोड बनवले गेले आहे. विशेष म्हणजे या कमोडची सीट बुलेट-प्रूफ तयार करण्यात आले आहे.
या ग्लॅमरस टॉयलेटची सीट बुलेट-प्रूफ ग्लासने तयार करण्यात आली असून यात 40,815 हिरे जडवण्यात आले आहेत. या हिर्यांचे वजन मिळून 334.68 कॅरेट आहे. सोने आणि हिर्यांपासून तयार केलेल्या या टॉयलेटची किंमत 1.3 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. शांघाई येथे चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपो येथे हा टॉयलेट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हाँगकाँगच्या ज्वेलरी ब—ांड कोरेनेटने हा कमोड बनवला आहे. दरम्यान, हा कमोड खरेदी करण्यासाठी कुणी इच्छा व्यक्त केली की नाही? याबाबत ब—ांड कोरोनेटचे संस्थापक हारुन शुम यांनी सांगितलेलं 'नाही'! मात्र, ते स्वतःही हे कमोड विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. 'जास्तीत जास्त लोकांना हे टॉयलेट पाहता यावे यासाठी एक संग्रहालय असावे', अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सोन्याच्या या टॉयलेटवर भरपूर चर्चा होत आहे. अनेकांनी ही गोष्ट हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.