अंटार्क्टिकामध्ये एम्परर पेंग्विनच्या चार नव्या वसाहतींचा लागला शोध

अंटार्क्टिकामध्ये एम्परर पेंग्विनच्या चार नव्या वसाहतींचा लागला शोध

लंडन : अंटार्क्टिकामध्ये एम्परर पेंग्विनच्या यापूर्वी कधीही न पाहिलेल्या चार नव्या वसाहतींचा छडा लावण्यात आला आहे. हा शोध पेंग्विनच्या विष्ठेचा मागोवा घेणार्‍या उपग्रहांनी लावला, हे विशेष! या शोधामुळे आता एम्परर पेंग्विन या प्रजातीच्या पेंग्विनच्या अंटार्क्टिकामधील वसाहतींची संख्या 66 वर गेली आहे. 'जर्नल अंटार्क्टिक सायन्स'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली.

ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेमधील संशोधक पीटर फ्रेटवेल यांनी सांगितले की, एम्परर पेंग्विनच्या वसाहती कुठे व कशा विखुरलेल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी तसेच हे पेंग्विन जागतिक तापमानवाढीचा कसा सामना करीत आहेत, हे समजण्यासाठीही हा शोध महत्त्वाचा आहे. या संशोधनासाठी मॅक्सर वर्ल्ड व्ह्यू-2 इमेजरी मॉनिटरींग सॅटेलाईट आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या 'सेंटिनेल-2' सॅटेलाईटच्या 2018 ते 2022 या काळातील डेटाचा आधार घेण्यात आला.

अगदी अंतराळातूनही अंटार्क्टिकाच्या सफेद चादरीवरील पेंग्विनच्या तपकीरी विष्ठेचा छडा या यंत्रणांच्या साहाय्याने लावता येतो. या नव्या चार वसाहती अनेक वर्षांपासून तिथे असाव्यात, असेही दिसून आले आहे. या वसाहती छोट्या छोट्या असून त्यामध्ये प्रत्येकी एक हजार किंवा त्यापेक्षा कमी संख्येत पेंग्विनच्या जोड्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news