दिल्ली विमानतळावर सुरू होणार पहिली एअर ट्रेन

भारतात लवकरच एअर ट्रेनही धावणार
First Air Train to start at Delhi Airport
भारतात लवकरच एअर ट्रेनही धावणार आहेPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : आपल्या देशातील ‘वंदे भारत’ व ‘मेट्रो’ रेल्वेंची चर्चा जगभर आहे. पाकिस्तानी जनता तर त्यांचे व्हिडीओ डोळे विस्फारून आणि ‘आ’ वासून पाहत असते! आता भारतात लवकरच एअर ट्रेनही धावणार आहे. त्यासाठी जवळपास 2000 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे, पण यात्रेकरूंना या प्रवासासाठी छदाम सुद्धा द्यावा लागणार नाही. प्रवासी मोफतच एअर ट्रेनचा प्रवास करू शकतील. अर्थात ही ट्रेन दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येईल.

First Air Train to start at Delhi Airport
गुड न्यूज! लाइन तीनसाठी पहिली मेट्रो ट्रेन दाखल

देशात रेल्वेचे मजबूत जाळे विणलेले आहे. दररोज जवळपास दोन ते अडीच कोटी प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. लाखो रुळांवरून देशभरात ट्रेन धावतात. सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेल, पॅसेंजर अशा ट्रेन देशभरात जातात, पण प्रवाशांसाठी आता हवाई ट्रेनही धावणार आहे. ही रेल्वे अत्यंत खास आणि आकर्षक असेल. ही देशातील पहिली आणि एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन हवेशी जणू गप्पा मारेल! प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाईल. ही ट्रेन स्वयंचलित असेल व दिल्ली विमानतळावर कनेक्टिव्हिटी अजून प्रभावी करण्यासाठी तिचा वापर करण्यात येईल. दिल्ली आतंरराष्ट्रीय विमानतळावर या एअर ट्रेनसाठी वेगवेगळे टर्मिनल उभारण्यात येतील. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टचे सर्व टर्मिनल या एअर ट्रेनला जोडलेले असतील. विमानतळावरील 1, 2 आणि 3 टर्मिनलच्या दरम्यान 7.5 किलोमीटरचा हा मार्ग असेल. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने टर्मिनलच्या दरम्यान ऑटोमेटेड पीपल मुव्हर म्हणजे एअर ट्रेनसाठीची तयारी केली आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत, 2027 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचा अंदाजित खर्च 2000 कोटी रुपये इतका आहे. ही एअर ट्रेनची टी1, टी2/3, एअरोसिटी आणि कार्गो सिटी येथे थांबे असतील. विशेष म्हणजे या ट्रेनसाठी प्रवाशांना एक छदाम पण खर्च करावा लागणार नाही. सध्या दिल्ली विमानतळावरून वर्षाला 7 कोटींहून अधिक प्रवाशी उड्डाण करतात. येत्या काही वर्षांत ही संख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे टर्मिनल्सदरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी एअर ट्रेन महत्त्वाची असेल. एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर लोकांच्या वेळेत मोठी बचत होईल. सध्या प्रवाशी एका टर्मिनलवरून दुसर्‍या टर्मिनलवर जाण्यासाठी डीटीसी या शटल बसचा वापर करतात. एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.

मुंबईत ९३ वर्षापूर्वी धावली पहिली इलेक्ट्रीकल ट्रेन!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news