बर्फाळ प्रदेशातील हटके विवाह सोहळा!

बर्फाळ प्रदेशातील हटके विवाह सोहळा!

जर्मेट-स्वित्झर्लंड : सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे बरेच फॅड आले आहे. त्याआधी प्री-मॅरेज शूट हीतर फॅशन होते आहे. आयुष्यातील अतिशय खास क्षणांपैकी एक असणारा हा विवाह सोहळा अतिशय स्वप्नवत असावा, असे जवळपास प्रत्येकाला वाटते आणि त्याद़ृष्टीने आपल्या ताकदीनुसार, हे शिवधनुष्य पेललेही जाते. आता असे विवाह सोहळे भव्यदिव्य हॉलमध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये, खुल्या मैदानातील मंडपात किंवा अगदी समुद्र किनार्‍यावरही आयोजित केले जातात. एका जोडगोळीने मात्र कहरच केला असून, त्यांनी चक्क बर्फाळ प्रदेशात विवाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

या अनोख्या विवाहाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वित्झर्लंडच्या जर्मेटमध्ये हा लग्नसोहळा पार पडला आहे. समुद्रतळापासून 2,222 मीटर उंचावर बर्फाळ प्रदेशात डोंगरावर हे लग्न झाले. यातील सर्व छायाचित्रांमध्ये मागे बर्फाचा डोंगर दिसून येतो. शिवाय, विवाहातील सर्व सजावटही त्याच पद्धतीने केली गेली आहे. व्हायोलिन वादक स्नो एंजल्सच्या रूपात आहेत. लग्नातील स्टाफनेही आइस-क्यूब हेडगियर, आइस थीमवाले ड्रेस परिधान केले आहेत.

ड्रिंकसुद्धा आइस क्यूब ट्रेमधून सर्व्ह करण्यात आले. विवाह सोहळ्यात वर-वधूंची एन्ट्री खास असते. येथे वधू चक्क बर्फाच्या तुकड्यातून आली. नंतर या जोडगोळीने बर्फाच्या आतूनही पोझ दिले. या अनोख्या विवाहाचे फोटो पाहिल्यावर त्यावर बर्‍याच कमेंट येत आहेत. ग्रँड वेडिंग, राजा-राणी लग्न करत आहेत, असं वाटत आहे. हे एकदम वेगळं लग्न आहे. पहिल्यांदाच असे अद्भुत लग्न पाहिले, अशा प्रतिक्रिया युझर्सच्या आल्या आहेत. एका युझरने तर, आपणही भविष्यात मीही असाच विवाह करणार असल्याचे म्हटले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news