Mountain Taller Than Everest | एव्हरेस्टपेक्षाही उंच पर्वत भूतकाळात होता का?

Mountain Taller Than Everest |
Mountain Taller Than Everest | एव्हरेस्टपेक्षाही उंच पर्वत भूतकाळात होता का?
Published on: 
Updated on: 

सिडनी : गगनचुंबी शिखरांची निर्मिती होणे ही एक अत्यंत संघर्षाची प्रक्रिया आहे, आणि पृथ्वीवर दोन भूखंडीय प्लेट्स (Continental Plates) आपटण्यापेक्षा अधिक मोठे व प्रचंड तांडव दुसरे कोणते असू शकते? भूप्रदेशांच्या या टक्करमधून आणि भूगर्भीय घडामोडींमुळेच माऊंट एव्हरेस्ट आणि त्याच्या आजूबाजूच्या हिमालयीन पर्वतरांगांसह या ग्रहावरील अनेक महाकाय आणि उंच पर्वतांची निर्मिती झाली आहे. पण समुद्राच्या सपाटीपासून २९,०३२ फूट (८,८४९ मीटर) उंची असलेल्या माऊंट एव्हरेस्टपेक्षाही कधी एखादे उंच शिखर भूतकाळात अस्तित्वात होते का?

या प्रश्नाचे उत्तर अद्यापही एक गूढच आहे; परंतु प्राचीन काळात सर्वात उंच शिखरे कुठे असू शकतात, याचे काही भूगर्भशास्त्रीय पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. शेकडो दशलक्ष वर्षांपूर्वी नक्की कोणते शिखर सर्वात उंच होते, हे अचूकपणे सांगता येईल एवढा सविस्तर तपशील भूगर्भशास्त्रज्ञांकडे नाही. ऑस्ट्रियातील ॲडलेड विद्यापीठाचे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक ॲलन कॉलिन्स यांनी सांगितले की, ‘‘दुर्दैवाने, आपल्याला कधीही इतकी अचूक माहिती मिळणार नाही.’’ तरीही, पृथ्वीच्या भूपालसाच्या (Crust) आत असलेल्या अवशिष्ट गाळातील (Residual Sediments) काही खुणा आपल्याला प्राचीन बर्फाच्छादित शिखरांच्या हरवलेल्या वैभवाची साक्ष देतात.

हे प्राचीन पर्वत किती उंच असावेत, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक या थरांचा अभ्यास करतात, ज्यामुळे ते पर्वत किती खोलवर रुजले होते हे समजू शकते. पर्वत हे खऱ्या अर्थाने भूपालसाचेच भाग असतात, जे टेक्टोनिक प्लेट्सच्या मंद गतीच्या धडकेमुळे वर उचलले जातात. हा भूप्रदेश खूप जड असतो आणि त्याच्या पृष्ठभागावर जे दिसते त्यापेक्षा कितीतरी अधिक भाग खाली असतो. एव्हरेस्टसारखी अत्यंत उच्च शिखरेदेखील खोल भूकवचात घट्ट रुजलेली असतात. ज्याप्रमाणे भूप्रभाग पर्वतांची शिखरे तयार करण्यासाठी वर ढकलला जातो, त्याचप्रमाणे तो पृष्ठभागाच्या खालीही खूप खोलवर दाबला जातो. कॉलिन्स आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठाचे जिओसिमस्ट झियी झू या दोघांनी पर्वतांची तुलना हिमनद्यांशी केली आहे, कारण ज्याप्रमाणे हिमनगाचा केवळ एकछोटा भाग पाण्यावर दिसतो, तसेच पर्वतांचेही असते. झू यांनी सांगितले, ‘‘आपण असा युक्तिवाद किंवा तर्क लावू शकतो की [सर्वात मोठा पर्वत] अशा ठिकाणी असावा, जिथे भूकवचाची मुळे खूप खोलवर रुजलेली होती.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news