पृथ्वीवर ‘त्या’ फवार्‍यातून वर आले होते हिरे!

पृथ्वीवर ‘त्या’ फवार्‍यातून वर आले होते हिरे!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : क्रेटाशियस काळात म्हणजेच सुमारे 8 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीच्या काळात सध्याच्या दक्षिण आफ्रिकेत एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. जमिनीच्या पृष्ठभागाखाली शेकडो मैल खाली असलेला मॅग्मा यावेळी वर उसळून आला होता. त्याच्याबरोबर पृथ्वीच्या पोटातील अनेक खडक, खनिजे आणि हिरेही पृष्ठभागावर आले होते.

ही घटना माऊंट व्हेसुवियसच्या उद्रेकाइतकीच नाट्यमय होती. या उद्रेकानंतर व्हाईट हिल्समध्ये मागे गाजराच्या आकाराच्या, खडकांनी भरलेल्या नलिकाच खोलवर मागे राहिल्या. सन 1869 मध्ये एका मेंढपाळाला जवळच्या नदीच्या काठावर एक चमकदार व मोठा दगड दिसून आला. हा दगड साधा नव्हता तर तो चक्क हिरा होता! कालांतराने हाच हिरा 'स्टार ऑफ आफ्रिका' या नावाने प्रसिद्ध झाला. हा हिरा जिथे सापडला तिथे पुढे एका मोठ्या खाणीची निर्मिती झाली. व्हाईट हिल्समध्ये मग 'डायमंड रश' सुरू झाली आणि किम्बर्ली माईन नावाची ही खाण प्रसिद्ध झाली.

दक्षिण आफ्रिकेतील हे महत्त्वाचे ठिकाण असून माणसाने खोदलेला हा सर्वात मोठा खड्डा आहे. या किम्बर्ली खाणीला 'द बिग होल' असे म्हटले जाते. याठिकाणी आढळणार्‍या हिर्‍यांना 'किम्बर्लीटीज' असे म्हटले जाते. हे हिरे कसे वर आले याबाबत संशोधन सुरू झाले. याठिकाणी गेल्या 50 दशलक्ष वर्षांमध्ये अतिशय कमी उद्रेक झालेले आहेत. त्यापैकी सर्वात अलीकडचा उद्रेक टांझानियाच्या इगविसी हिल्समध्ये दहा हजार वर्षांपूर्वी झाला होता. प्राचीन काळी अशा उद्रेकांमधूनच पृथ्वीच्या मँटलमधील अनेक खडक, खनिजे वर आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news