डेन्मार्क सर्वात स्वच्छ देश

डेन्मार्क सर्वात स्वच्छ देश
Published on
Updated on

कोपनहॅगन : जगभरात एकापेक्षा एक सुंदर ठिकाणांची अजिबात कमी नाही. मात्र प्रत्येक ठिकाणी प्रदूषणही आहे. प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून, लोकांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम स्पष्टपणे दिसूनही येत आहेत. ग्लोबल वार्मिंगचे फटके सातत्याने दिसून येत आहेत. आता प्रदूषणाची ही पातळी कमी करण्यासाठी बरेच प्रयत्नही केले जातात. पण, त्याला अनेक मर्यादा असल्याचे अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर, 'एन्व्हरायमेंट परफॉर्मन्स इंडेक्स'ने स्वच्छ देशांची यादी जाहीर केली असून, यात प्रदूषण जवळपास नाहीच अशा देशांची वर्णी लागली आहे. या यादीनुसार, डेन्मार्क हा जगातील सर्वात स्वच्छ देश ठरतो आहे.

या सर्व्हेक्षणात जवळपास 180 देशांचा अभ्यास करण्यात आला असल्याचे नमूद केले गेले आहे. देशातील हवेचा स्तर, प्रदूषणाची स्थिती, स्वच्छता व नीटनेटकेपणा, यावर या सर्वेमध्ये भर दिला गेला आहे. या यादीत डेन्मार्कचा अव्वल क्रमांक लागतो, असे यात जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वीदेखील पर्यावरणाच्या बाबतीत डेन्मार्क नेहमीच उत्तमोत्तम राहत आले आहे. डेन्मार्कचे नागरिक पर्यावरणाबाबतीत अतिशय जागरूक आहेत, तेदेखील यामागील एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते.

डेन्मार्कमध्ये खासगी वाहनांचा वापर अतिशय कमी होतो. लोक सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर करतात आणि त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात सायकलने प्रवास करतात. यामुळे प्रदूषणाची समस्या कमी होते. याचेच कारण म्हणून सर्वे करण्यात आलेल्या 180 देशांमध्ये डेन्मार्कचे प्रदूषण सर्वात कमी आहे आणि याचमुळे हा सर्वात स्वच्छ देश म्हणून ओळखला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news