Daffy Duck | डॅफी डक झाला 89 वर्षांचा!

Daffy Duck |
Daffy Duck | डॅफी डक झाला 89 वर्षांचा!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अ‍ॅनिमेशनच्या रंगीबेरंगी दुनियेत अशा अनेक पात्रांनी प्रवेश केला, ज्यांनी मुले आणि मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवले. मात्र, जगातील सर्वात चर्चेत असलेल्या आणि काहीशा विचित्र अशा ‘डॅफी डक’ या कार्टून पात्राची सुरुवात कशी झाली, हे तुम्हाला माहीत आहे का? डॅफी डक हे केवळ एक कार्टून नसून अ‍ॅनिमेशनच्या सुवर्णकाळातील असा शोध आहे, ज्याने पडद्यावर येताच इतिहास रचला. आता हे कार्टून पात्र 89 वर्षांचे झाले आहे.

डॅफी डकचा ‘जन्म’ 17 एप्रिल 1937 रोजी झाला. ‘पोर्कीज डक हंट’ नावाच्या कार्टूनमधून तो पहिल्यांदा जगासमोर आला. विशेष म्हणजे, सुरुवातीला डॅफी या शोचा मुख्य नायक नव्हता. त्या काळात ‘पोर्की पिग’ हे मुख्य पात्र होते आणि डॅफीला केवळ एक सहाय्यक पात्र म्हणून सादर करण्यात आले होते, पण डॅफीच्या अतरंगी हालचाली आणि अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. " Don' t let it worry ya skipper" ही त्याची प्रसिद्ध ओळ आणि विचित्र वागण्यामुळे लोक त्याचे वेडे झाले. 1930 चा काळ अ‍ॅनिमेशन उद्योगासाठी अत्यंत आव्हानात्मक होता.

एका बाजूला ‘वॉल्ट डिस्ने’कडे मिकी माऊससारखी लोकप्रिय आणि शांत स्वभावाची पात्रे होती, तर दुसरीकडे ‘वॉर्नर ब्रदर्स’ त्यांच्या ‘लूनी ट्यून्स’च्या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होते. याच तीव्र स्पर्धेतून डॅफी डकचा जन्म झाला आणि त्याने वॉर्नर ब्रदर्सला एक नवी ओळख मिळवून दिली. सुरुवातीच्या दिवसांत डॅफी डक एक अत्यंत उत्साही आणि काहीसा वेडा दाखवण्यात आला होता. तो स्वतःच्याच मस्तीत राहणारा बदक होता. मात्र, काळासोबत त्याच्या व्यक्तिमत्त्वात मोठे बदल झाले. तो हळूहळू थोडा रागीट, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणारा आणि स्वार्थी दिसू लागला. त्याच्या स्वभावातील याच चढ-उतारांमुळे हे पात्र अधिक वास्तववादी आणि मजेशीर बनले. डॅफी डकला जिवंत करण्यामागे ‘मॅन ऑफ 1000 व्हॉईसेस’ म्हणून ओळखले जाणारे महान कलाकार मेल ब्लांक यांचा मोठा वाटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news