भाजीविक्रेत्याने बनवले आठ देशांची वेळ सांगणारे घड्याळ

भाजीविक्रेत्याने बनवले आठ देशांची वेळ सांगणारे घड्याळ
Published on
Updated on

लखनौ : जुन्या जमान्यातील 'टू-इन-वन' म्युझिक सिस्टीमपासून प्रेरणा घेऊन लखनौतील एका भाजी विक्रेत्याने अनोखे घड्याळ बनवले आहे. अनिल कुमार साहू नावाच्या या भाजी विक्रेत्याने भारतासह आठ देशांची वेळ दाखवणारे हे घड्याळ बनवले आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना असेच एक घड्याळ साहू यांनी भेट म्हणून दिले आहे.

अनिल कुमार साहू (वय 52) यांनी डिझाईन केलेले घड्याळ सध्या लखनौच्या 'हॅनिमन क्रॉसिंग' मधील भाजी मंडईत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. अनेक भाजी विक्रेते, ग्राहक या घड्याळाविषयी कुतूहल व्यक्त करीत असतात व त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे घड्याळ भारत, दुबई (संयुक्त अरब अमिरात), टोकियो (जपान), मॉस्को (रशिया), बीजिंग (चीन), सिंगापूर, मेक्सिको सिटी (मेक्सिको), वॉशिंग्टन व न्यूयॉर्क (अमेरिका) येथील वेळ एकाच वेळी दर्शवते.

या घड्याळात एक काटा असा आहे, जो तास आणि मिनिट दोन्ही दर्शवतो. दुसरा काटा सेकंदाचा आहे. जर भारतात दुपारचे अडीच वाजलेले असतील, तर दुबईत त्यावेळी दुपारचा एक वाजलेला असतो. तसेच टोकियोमध्ये सायंकाळचे सहा, मॉस्कोमध्ये दुपारचे बारा, बीजिंग व सिंगापूरमध्ये सायंकाळचे पाच, मेक्सिको सिटीत रात्रीचे तीन आणि वॉशिंग्टन व न्यूयॉर्कमध्ये पहाटेचे चार वाजलेले असतात. ही सर्व वेळ घड्याळात एकाचवेळी पाहता येते. अलीकडेच साहू यांनी चंपत राय यांना 75 सेंटिमीटर व्यासाचे असेच घड्याळ भेट म्हणून दिले आहे. आता भविष्यात 25 देशांची वेळ सांगणारे घड्याळ बनवण्याचा त्यांचा मनोदय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news