Mysterious Turtle deaths causes | हवामान बदलामुळे वाढतोय धोका; कासवांच्या गूढ मृत्यूने संकेत!

Mysterious Turtle deaths causes |
Mysterious Turtle deaths causes | हवामान बदलामुळे वाढतोय धोका; कासवांच्या गूढ मृत्यूने संकेत!
Published on
Updated on

ओटावा : कॅनडातील ओंटारियो प्रांतातील ओपिनिकॉन तलावात 2022 मध्ये घडलेली एक धक्कादायक घटना आता पर्यावरणासाठी गंभीर इशारा ठरत आहे. शंभराहून अधिक कासवांचे मृतदेह, काहींची कवच फोडलेली, तर काहींचे अवयव विखुरलेले आढळल्याने संशोधक हादरले.

कार्लेटन विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ ग्रेगरी बुल्टे यांनी एप्रिल महिन्यात तलावात संशोधन करताना ही भीषण द़ृश्ये पाहिली. सुरुवातीला एक मृत ‘नॉर्दर्न मॅप टर्टल’ दिसले, पण काही वेळातच मृत कासवांची संख्या वाढत गेली. अखेरीस त्यांनी सुमारे 150 मृत कासवे गोळा केली, जी त्या तलावातील सुमारे 10 टक्के लोकसंख्येइतकी होती.

तपासाअंती हे स्पष्ट झाले की हा प्रकार नदीतील ऊद (रिव्हर ऑटर) ने केलेल्या शिकारीमुळे झाला असावा. हिवाळ्यात ही कासवे मोठ्या समूहात तलावाच्या तळाशी बर्फाखाली राहतात. त्या काळात ती अत्यंत असुरक्षित असतात. कारण जर शिकार्‍याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले, तर तो सहज मोठ्या प्रमाणात हल्ला करू शकतो. मात्र मुख्य प्रश्न असा होता की ऊद या जाड बर्फाखाली कसे पोहोचले? यावर संशोधकांनी हवामानातील बदलाला संभाव्य कारण मानले आहे. तापमान वाढल्याने किनार्‍याजवळील बर्फ वितळतेे आणि त्यातून ऊद आत शिरू शकतात.

कासवांचे अस्तित्व धोक्यात

नॉर्दर्न मॅप टर्टल ही प्रजाती कॅनडात ‘विशेष दुर्मीळ’ यादीत आहे. त्यांची वाढ धिमी असते, प्रजनन उशिरा होते आणि पिल्लांचे जगण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रौढ कासवांचा मृत्यू हा संपूर्ण प्रजातीसाठी धोकादायक ठरू शकतो. याशिवाय मानवी हस्तक्षेपही मोठा धोका आहे. बोटींचे अपघात, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे, किनार्‍यावरील बांधकामे आणि पाण्यातील ‘बबलर’ यंत्रणा यामुळे त्यांच्या अधिवासावर परिणाम होतो.

भविष्यासाठी इशारा

ही घटना एक इशारा म्हणून पाहिली जात आहे. हवामान बदलामुळे बर्फाचा कालावधी कमी होत असल्याने अशा शिकारी हल्ल्यांची शक्यता वाढू शकते. जरी ही एकच घटना असली, तरी कासवांच्या जीवनपद्धतीमुळे ते वारंवार अशा धोक्याला सामोरे जाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, कासवांसाठी सुरक्षित हिवाळी अधिवास जपणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, अनेक छोट्या-छोट्या धोक्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे ‘हजार जखमांनी मृत्यू’ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news