बुध ग्रहावर आहे ‘हा’ खजिना

बुध ग्रहावर आहे ‘हा’ खजिना

बीजिंग ः अंतराळातील अनेक खगोल काही खनिजांनी, अगदी हिर्‍यांनीही भरलेले आहेत. आपल्याच सौरमालिकेत असा मौल्यवान खजिना असलेला एक ग्रह आहे. बुध ग्रहावर हिर्‍यांचा खजिना असल्याचा दावा चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. त्यासोबतच हा ग्रह इतका काळा का दिसतो याचं कारणही शोधून काढलं आहे.

दक्षिण चीनमधील झुहाई येथील सन यात-सेन विद्यापीठातील संशोधकांनुसार, बुध ग्रहाच्या असामान्यपणे काळा दिसण्यामागील रहस्य त्याचं चमकणे असावे. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ग्रॅफाईटमुळे ग्रह गडद रंगाचा दिसतो. या ग्रहावर ग्रॅफाईटचे प्रमाण पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी असू शकते आणि येथे हिरे आणि इतर प्रकारचे कार्बन जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. संशोधक म्हणतात की, जर पूर्वीची गणितं बरोबर असती तर अनेक हिरे आणि इतर प्रकारचे कार्बन पदार्थ ग्रहाच्या पृष्ठभागावर दिसले असते; परंतु असे नाही. हा अभ्यास नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित झाला आहे. 'नासा'च्या मेसेंजर स्पेसक्राफ्टने 2011 ते 2015 पर्यंत बुध ग्रहाचा डेटा घेतला, जो संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात वापरला. बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे, जो पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. हा खडकाळ ग्रह पृथ्वीपासून 77 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. शास्त्रज्ञांच्या मते, इथे पोहोचणे अवघड आहे. तसेच, येथे जीवनाचीही शक्यता नाही. मागील अभ्यासात असेही मानले जाते की कार्बन बुधाच्या पृष्ठभागापासून खूप खोलवर तयार झाला असावा. परंतु, हा संपूर्ण कार्बन ग्रॅफाईट नसावा, असे नवीन अभ्यासात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news