China EV industry | कारमध्ये बसताच मिळेल मसाज, हवं तर बनवा मिनी थिएटर!

चीनच्या इलेक्ट्रिक गाड्यांनी जगाला पाडले कोड्यात
China EV industry |
China EV industry | कारमध्ये बसताच मिळेल मसाज, हवं तर बनवा मिनी थिएटर!
Published on
Updated on

बीजिंग : जगात इंधनाचे दर गगनाला भिडत असताना चीनने मात्र भविष्याची तयारी आधीच पूर्ण केल्याचे दिसत आहे. अनेक देश अजूनही पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमध्ये अडकलेले असताना, चीनच्या इलेक्ट्रिक कार (ईव्ही) तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाला थक्क करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, आता जगातील मोठ्या ऑटो कंपन्यांची झोप उडाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बीजिंग ऑटो शोमध्ये चीनने केवळ कार नाही, तर चालते-फिरते ‘टेक्नोलॉजी पॅकेज’ सादर केले. यामध्ये काही थक्क करणार्‍या गोष्टी पाहायला मिळाल्या : आरामदायी सुविधा : कारमध्ये बसताच पायांचा मसाज सुरू होणारी सिस्टीम असो किंवा मागे बसणार्‍यांना सोयीचे व्हावे म्हणून फिरणार्‍या जागा (सीटस्). करमणूक : प्रोफेशनल म्युझिक स्टुडिओसारखा अनुभव देणारी ‘कराओके’ सिस्टीम अनेक गाड्यांमध्ये बसवण्यात आली आहे. मिनी थिएटर : काही मॉडेल्सच्या हेडलाईटस् इतक्या प्रगत आहेत की, त्या भिंतीवर चित्रपट प्रक्षेपित करू शकतात. म्हणजेच तुम्ही कुठेही आपली कार ‘मिनी थिएटर’मध्ये बदलू शकता.

चीनची सर्वात मोठी ताकद म्हणजे कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता. आता अगदी स्वस्त कारमध्येही ‘स्मार्ट ड्रायव्हिंग’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) फीचर्स सामान्य झाले आहेत. इराण युद्धासारख्या परिस्थितीमुळे जेव्हा तेलाच्या किमती वाढत आहेत, तेव्हा इलेक्ट्रिक गाड्या लोकांना अधिक परवडणारा पर्याय वाटू लागल्या आहेत. ‘बीवायडी’ कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह स्टेला ली यांनी सांगितले की, ‘एकदा इलेक्ट्रिक कार वापरणारा व्यक्ती पुन्हा पेट्रोल गाडीकडे वळत नाही.’ आज चीनमध्ये विकल्या जाणार्‍या एकूण नवीन गाड्यांपैकी निम्म्याहून अधिक गाड्या इलेक्ट्रिक किंवा हायब—ीड आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news