काही वेळासाठी गायब होणार ‘हा’ तारा!

काही वेळासाठी गायब होणार ‘हा’ तारा!
Published on
Updated on

लंडन ः आकाशातील एक चमकता तारा काही वेळासाठी गायब होणार आहे. याचे कारण म्हणजे त्यावेळी त्याच्यासमोरून एक लघुग्रह जाणार जाणार आहे. ही घटना अवकाशातील एका अनोख्या ग्रहणाचे उदाहरण म्हणून ओळखले जाईल. 11 डिसेंबरला म्हणजे सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी भल्या पहाटे ही घटना घडेल.

या खगोलीय घटनेला मध्य आशियातील ताजिकिस्तान आणि आर्मेनियापासून तुर्की, ग्रीस, इटली आणि स्पेनपर्यंत तसेच मियामी आणि फ्लोरिडा कीज व शेवटी मेक्सिकोच्या काही भागांपर्यंत पाहता येऊ शकेल. या तार्‍याचे नाव 'बेटेल्गेयूज' असे आहे. ओरायन तारामंडळातील हा एक विशाल लाल तारा आहे. त्याच्या समोरून 'लियोना' नावाचा एक लघुग्रह जाईल. मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान जो 'अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट' आहे त्यामधीलच हा एक लघुग्रह आहे. तो आयताकृती आणि हळूहळू फिरणारा लघुग्रह आहे.

बेटेल्गेयूज हा रात्री आकाशात सर्वाधिक प्रकाशात चमकत असतो. या तार्‍याचा 'सुपरनोव्हा' या नावाने ओळखला जाणारा स्फोट होऊन लवकरच त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्याचा व्यास 700 दशलक्ष मैलांपेक्षा अधिक आहे. त्याला त्याच्या खास नारंगी रंगासाठी ओळखले जाते. खगोलशास्त्रज्ञांना ज्ञात असलेल्या मोठ्या तार्‍यांपैकी तो एक आहे. या ग्रहणाच्या माध्यमातून खगोलशास्त्रज्ञांना बेटेल्गेयूज तारा आणि लियोना लघुग्रह या दोन्हीबाबत अधिक माहिती गोळा करता येईल. अर्थात हे ग्रहण जास्तीत जास्त 15 सेकंदांचेच असेल! त्यावेळी हा तारा पूर्णपणे गायब होईल का याची उत्सुकता संशोधकांना आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news