Brain Efficiency Study | मेंदूची कार्यक्षमता वयाच्या 55 ते 60 वर्षांदरम्यान असते शिखरावर!

जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपले ‌‘उत्तम दिवस‌’ मागे पडत आहेत, असे अनेकांना वाटत असेल. पण घाबरून जाण्याचे कारण नाही! एका नवीन अभ्यासामध्ये असे सुचवले आहे की, तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस अजून यायचे आहेत.
Brain Efficiency Study
मेंदूची कार्यक्षमता वयाच्या 55 ते 60 वर्षांदरम्यान असते शिखरावर!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपले ‌‘उत्तम दिवस‌’ मागे पडत आहेत, असे अनेकांना वाटत असेल. पण घाबरून जाण्याचे कारण नाही! एका नवीन अभ्यासामध्ये असे सुचवले आहे की, तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस अजून यायचे आहेत. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, मानवी मेंदूचे एकूण मानसिक कार्य प्रत्यक्षात 55 ते 60 या वयोगटात शिखरावर पोहोचते. या वयोगटातील लोक जटिल समस्या सोडवण्याच्या कामांसाठी आणि कामाच्या ठिकाणी उच्चस्तरीय नेतृत्वाच्या भूमिकांसाठी सर्वोत्तम स्थितीत असू शकतात.

अभ्यासाचे लेखक, मानसशास्त्रज्ञ प्राध्यापक गिल्स गिग्नॅक म्हणाले, ‌‘तुमचे तारुण्य जसजसे दूर जात जाईल, तसतसे तुम्हाला वाढत्या वयाची भीती वाटू शकते. पण आमचे संशोधन सांगते की, उत्साहित होण्यासाठी एक चांगले कारण आहे. आपल्यापैकी अनेकांसाठी, एकूण मानसिक कार्यक्षमता प्रत्यक्षात 55 ते 60 या वयोगटात शिखरावर पोहोचते. कदाचित आता वेळ आली आहे की, आपण मध्यम वयाला ‌‘काऊंटडाऊन‌’ मानणे थांबवावे आणि त्यास ‌‘शिखर‌’ म्हणून ओळखायला सुरुवात करावी. यापूर्वीच्या अभ्यासातून असे समोर आले होते की, ‌‘माणूस त्याच्या शारीरिक क्षमतेच्या शिखरावर पंचविशीच्या मध्यापासून ते तिशीच्या सुरुवातीस पोहोचतो, त्यामुळेच ॲथलिटस्‌‍ची कारकीर्द तुलनेने लहान असते. मात्र, बौद्धिक क्षमतेच्या शिखराबाबत चित्र अस्पष्ट होते.‌’ प्राध्यापक गिग्नॅक यांच्या टीमने पूर्वीच्या 16 प्रमुख संज्ञानात्मक आणि व्यक्तिमत्त्व-संबंधित गुणांचे विश्लेषण केले.

Brain Efficiency Study
India World Cup Preparation | टीम इंडियाला आगामी वर्ल्डकपच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वाचा

या 16 गुणांमध्ये नैतिक तर्कशक्ती, स्मरणशक्ती, प्रक्रिया गती, ज्ञान आणि भावनिक बुद्धिमत्ता यांचा समावेश होता. यामध्ये ‌‘बिग फाईव्ह‌’ व्यक्तिमत्त्व गुणधर्म-जसे की बहिर्मुखता, भावनिक स्थिरता, कर्तव्यनिष्ठा, अनुभवांसाठी मोकळेपणा आणि सहमतता यांचाही समावेश होता. प्राध्यापक गिग्नॅक यांच्या मते, या सर्व 16 गुणांचे वयानुसार होणारे बदल एकत्र करून पाहिल्यास, एक लक्षणीय नमुना समोर आला. ‌‘एकूण मानसिक कार्यक्षमता 55 ते 60 या वयोगटात शिखरावर पोहोचली आणि नंतर सुमारे 65 वर्षांनंतर ती कमी होऊ लागली. याचा अर्थ असा आहे की, ‌‘अनुभवामुळे आलेले शहाणपण आणि भावनिक समजूतदारपणा या काळात उच्चतम पातळीवर पोहोचतात, ज्यामुळे हा वयोगट जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी योग्य ठरतो.‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news