

मुंबई; वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवार (दि. 19 ऑक्टोबर) पासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवरील लढतीने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरा सामना अॅडलेड ओव्हल (23 ऑक्टोबर) आणि तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड (25 ऑक्टोबर) येथे खेळवला जाणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली अजूनही भारतीय संघात आहेत. हे दोघे विजेता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळले होते. नियमित कर्णधार पॅट कमिन्स खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व मिचेल मार्श करणार आहे. ही मालिका भारताच्या 2027 विश्वचषक तयारीसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघ आणि त्यांच्या गत कामगिरीवर टाकलेला द़ृष्टिक्षेप...
अॅडम गिलख्रिस्ट सर्वाधिक यष्टिचित 79.
विराट कोहली सर्वाधिक आऊटफिल्ड कॅचेस 32.
सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळले 71.
एम. एस. धोनी सर्वाधिक सामन्यात कर्णधार (40).
रिकी पाँटिंग कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय 21 (35 सामन्यांत).
ऑस्ट्रेलियाने 84 विजय मिळवले आहेत.
भारताचा सर्वोच्च धावा : 399/5 (इंदोर, 2023),
सर्वात कमी धावा : 63 (सिडनी, 1981).
सचिन तेंडुलकर 3077 धावा, 9 शतके, 15 अर्धशतके (71).
विराट कोहली 15 अर्धशतके.
रोहित शर्मा सर्वोच्च वैयक्तिक धावा 209, सर्वाधिक षटकार 88, 2014 मध्ये एका मालिकेत 491 धावा.
ब्रेट ली 55 विकेटस्.
मुरली कार्तिक सर्वोत्तम बॉलिंग फिगर्स 6/27.
पॅट कमिन्स 5 सामन्यांच्या मालिकेत 14 विकेटस् (2019).