तब्बल 48 लाखांची पाण्याची बाटली!

तब्बल 48 लाखांची पाण्याची बाटली!

लंडन : हल्ली आपण ज्या वस्तू सोबत घेऊन जातो त्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा हटकून समावेश असतो. विशेषतः उन्हाळ्यात तर अशा बाटलीची गरज भासते. बाजारात प्लास्टिकपासून ते स्टील, काच, तांब्यापर्यंतच्या सर्वच प्रकारच्या बाटल्या उपलब्ध असतात. त्यांची किंमत 100 ते 1000 रुपयांपर्यंत बदलत राहते; पण आज आम्ही तुम्हाला अशा पाण्याच्या बाटलीबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत हजार नाही तर लाखो रुपये आहे. सर्वात महागडी बाटली म्हणून तिने गिनिज बुकमध्ये नाव नोंदवले आहे. ही बाटली 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेली असून ती तब्बल 48 लाख रुपयांना विकली गेली होती!

'अ‍ॅक्वा डी क्रिस्टॅल्लो ट्रायब्युटो अ मॉडीग्लियानो' नावाची ही बाटली गेल्या 13 वर्षांपासून जगातील सर्वात महागडी आणि फॅशनेबल पाण्याची बाटली म्हणून ओळखली जाते. या बाटलीची 2010 पासून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या बाटलीत फक्त 750 मि.लि. पाणी भरलेले आहे. या बाटलीच्या खास पॅकेजिंग आणि डिझाईनमुळे या तिला एवढी किंमत आहे. खरंतर ही बाटली 24 कॅरेट शुद्ध सोन्याची बनलेली आहे आणि त्यात भरलेल्या पाण्यात 5 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचाही समावेश आहे.

एवढेच नाही तर त्यात भरलेले पाणी हे पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पाणी आहे. हे आईसलँड, फिजी आणि फ्रान्सच्या हिमनद्यांमधून आणले गेले आहे. या बाटलीचे डिझाईन फर्नांडो अल्तामिरानो यांनी केले आहे, जे त्यांच्या क्लासिक डिझाईनसाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या खास आणि क्लासिक डिझाईनमुळे 2010 मध्ये, या बाटलीला लिलावात 60 हजार डॉलर्स (48.60 लाख रुपये) पर्यंत बोली लावण्यात यश आले. या बाटलीला तिच्या डिझाईनसाठी पुरस्कारही मिळाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news