निळ्या गोकर्णीचा चहाही गुणकारी!

निळ्या गोकर्णीचा चहाही गुणकारी!

नवी दिल्ली : जगभरात अनेक प्रकारचे चहा पाहायला मिळतात. चीन, जपानसारख्या देशांमध्ये तर चहापान ही साधी क्रिया नसून तिला अनेक धार्मिक, सांस्कृतिक कंगोरेही आहेत. अनेक लोक आरोग्यासाठी हर्बल टी घेणे पसंद करतात. जो कॅफिन फ्री असतो. जसे की, ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी. पण तुम्हाला माहीत आहे का, ब्ल्यू टी सुद्धा एक हर्बल टी आहे. हा चहा निळ्या गोकर्णीच्या फुलांपासून बनवला जातो.

निळ्या गोकर्णीचा वापर भारतात प्राचीन काळापासून वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. वैज्ञानिक भाषेत त्याला 'क्लीटोरिया टरनेटिया' या नावाने ओळखले जाते. तज्ज्ञांच्या मते या ब्ल्यू टी च्या सेवनाने तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात.

ब्ल्यू टी मध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुण पीरियड्स दरम्यान येणारी सूज आणि दुखणे कमी करते. ब्ल्यू टी खास करून त्या महिलांसाठी फायदेशीर आहे ज्यांना या 4 दिवसांमध्ये त्रास सहन करावा लागतो. ब्लू टीमध्ये फ्लेवोनोइडस्सारखे अँटीऑक्सीडेंट्स गुण असतात, जे शरीरामध्ये फ्री रेडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात. हे शरीराला डिटॉक्सीफाई करते आणि शरीर आरोग्यदायी ठेवते. ब्ल्यू टी पिल्याने मानसिक अराम मिळतो आणि तणाव, चिंता कमी करण्यासाठी मदत करते.

पीरियडस् दरम्यान महिलांमध्ये बदलत्या हार्मोन्समुळे मेंटल स्ट्रेस वाढू शकतो. ज्याला ब्ल्यू टी पिऊन कमी केले जाऊ शकते. ब्ल्यू टी चे सेवन हार्मोनल संतुलन बनवण्यासाठी मदत करते. हे पीरियड सायकल रेग्युलर करण्यासाठी मदत करते. तसेच हार्मोन संबंधित समस्या कमी करण्यासाठी मदत करते. ब्ल्यू टी पाचनसाठी फायदेशीर असते. हे अपचन, ब्लोटिंग आणि अन्य पाचन समस्या कमी करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news