Blood test help detect depression | आता रक्ताच्या एका चाचणीतून ओळखता येणार डिप्रेशन

शरीरातील ‘इम्यून सेल्स’ सांगणार मनाची स्थिती!
Blood test help detect depression |
Blood test help detect depression | आता रक्ताच्या एका चाचणीतून ओळखता येणार डिप्रेशन
Published on
Updated on

न्यूयॉर्क : जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करते, तेव्हा डॉक्टर सहसा संवादातून आणि प्रश्नांतून आजाराचे निदान करतात. मात्र, अनेकदा रुग्ण आपली मानसिक स्थिती शब्दांत मांडण्यास असमर्थ ठरतात. या समस्येवर आता शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण तोडगा शोधला आहे. रक्ताच्या चाचणीमधूनही नैराश्याचा छडा लावला जाऊ शकतो.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या डॉ. निकोल बीलियू पेरेज यांच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी आणि मानसिक आरोग्य यांचा खोलवर संबंध आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी रक्तातील ‘मोनोसाइटस्’ नावाच्या पांढर्‍या पेशींची बारकाईने तपासणी केली. या पेशी शरीराचे आजारांपासून रक्षण करतात. संशोधनात असे दिसून आले की, ज्या महिला तीव— निराशा, उदासी किंवा अपयशाच्या भावनेने त्रस्त होत्या, त्यांच्या या पेशी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा अधिक ‘वृद्ध’ झाल्या होत्या. याचा अर्थ असा की, मानसिक नैराश्य केवळ मनालाच थकवत नाही, तर शरीरातील पेशींनाही अकाली वृद्ध बनवते.

हा अभ्यास एकूण 440 महिलांवर करण्यात आला, ज्यामध्ये काही एचआयव्ही बाधित होत्या तर काही निरोगी होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दोन्ही गटांतील महिलांमध्ये हा ‘ब्लड सिग्नल’ सारखाच आढळला. विशेषतः एचआयव्ही रुग्णांसाठी हे संशोधन खूप महत्त्वाचे आहे. कारण, नैराश्यामुळे त्यांच्या उपचार पद्धतीवर वाईट परिणाम होतो. वेळेत निदान झाल्यामुळे त्यांच्या आरोग्याची होणारी मोठी हानी टाळता येईल. ही शोधमोहीम वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती मानली जात असली, तरी प्रत्यक्षात रुग्णालयांमध्ये ही चाचणी उपलब्ध होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. शास्त्रज्ञांना आता हे शोधायचे आहे की डिप्रेशन सुरू होण्यापूर्वीच या पेशी वृद्ध दिसू लागतात का? योग्य उपचारानंतर या पेशींचे वय पुन्हा सामान्य होऊ शकते का?

महत्त्वाची निरीक्षणे :

डिप्रेशनमुळे शरीरातील पेशी वेळेपूर्वीच म्हातार्‍या होतात.

झोप न येणे किंवा भूक न लागणे यांसारखी लक्षणे इतर कारणांमुळेही असू शकतात; परंतु पेशींच्या वयाचा हा सिग्नल थेट नैराश्याशी संबंधित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news