

रोम : जग इतक्या आगळ्यावेगळ्या विचित्र वस्तूंनी, घटनांनी भरलेलं आहे की त्याबद्दल जेव्हा आपला कळते, तेव्हा नक्कीच आश्चर्य वाटते. कधी निसर्ग असेही रौद्र रूप दाखवतो की, मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. अशीच थरकाप उडवणारी घटना म्हणजे इटलीतील ब्लड रेन, अर्थात् रक्ताचा पाऊस!
प्रथमदर्शनी रक्ताच्या पावसाबद्दल सांगितले तर विश्वासही बसणार नाही. पण, इटली हा देश असाच आहे, जिथे पावसाचा रंग लाल असतो. शिवाय, त्या पावसाला ‘रक्ताचा पाऊस’ किंवा ‘ब्लड रेन’ असे संबोधलेही जाते.
इटलीमध्ये पावसाच्या पाण्यात विरघळणारे वाळूचे कण असतात. त्यामुळे जेव्हा हे पाणी पृथ्वीवर पडते तेव्हा वाळूमुळे ते लाल रंगाचे दिसते. यालाच ‘रक्ताचा पाऊस’ म्हणतात. इटली अरबी देशांच्या सहारा वाळवंटाला लागून आहे.
आता इटलीमध्येच नव्हे तर भारतातदेखील एकदा असा लाल रंगाचा पाऊस झाला आहे. 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 जुलै 2001 रोजी केरळमध्ये घडली होती. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये त्यावेळी लाल रंगाचा पाऊस पडला होता.
स्थानिक लोक या पावसाला ‘रक्तरंजित पाऊस’ म्हणतात. 1896 मध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणी देखील असा पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र, त्यावेळी तेथील पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या पावसाच्या नमुन्यावर संशोधन केले गेले. त्यावेळी पावसाच्या लाल रंगाचे कारण दुसरे तिसरे काही नसून, शैवाळ असल्याचे सुस्पष्ट झाले. पावसाच्या पाण्यात शेवाळाचे प्रमाण जास्त असल्याने ते लाल दिसू लागले, असे त्यात दिसून आले होते.