‘ट्विटर’चं पाखरू परतलं!

‘ट्विटर’चं पाखरू परतलं!
‘ट्विटर’चं पाखरू परतलं!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : 'ट्विटर'ची मालकी घेतल्यापासून अ‍ॅलन मस्क यांनी जे भन्नाट प्रकार करणे सुरू केले आहे ते अजूनही सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरचा लोगो बदलून निळ्या पक्ष्याऐवजी श्वानाचा लोगो वापरला होता. हा बदल पाहून वापरकर्ते हैराण झालेले पाहायला मिळत होते. त्यांनी याआधी आपला पाळीव कुत्रा शिबा इनू फ्लोकीला ट्विटरचे सीईओ बनवले होते. बदलानंतर, शिबा इनू ट्विटरच्या लोगोवरदेखील दिसत होता. आता पुन्हा ट्विटरच्या लोगोची चर्चा सुरू झाली आहे. कारण, तो प्रसिद्ध निळा पक्षी ट्विटरच्या लोगोवर परत आला आहे!

काही दिवसांपूर्वी अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरचा लोगो 'डोगेकॉईन' लोगोमध्ये बदलून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. लोकांना वाटले होते की, 'डोगेकॉईन' लोगो काही तास राहील आणि नंतर काढून टाकला जाईल. मात्र, तसे झाले नाही. आता 'डोगेकॉईन' लोगो हीच ट्विटरची ओळख असेल, असे वाटत होते. मात्र, हा लोगो केवळ वेब व्हर्जनमध्येच दिसत होता. ट्विटरचा बर्ड लोगो मस्क यांनी 'डोगेकॉईन'मध्ये बदलल्यावर मस्क यांनीदेखील त्याची खिल्ली उडवली होती. अ‍ॅलन मस्क यांनी एक जुना स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

ज्यामध्ये एका वापरकर्त्याने त्याला गमतीने सांगितले की, मस्क यांनी ट्विटर विकत घ्यावे आणि त्याचा लोगो 'डोगे' असा करावा. हा स्क्रीनशॉट शेअर करताना ते म्हणाले, 'आश्वासन दिल्याप्रमाणे' त्यांनी कंपनीचा लोगो बदलून दाखवला आहे. थोडक्यात, वापरकर्त्याने दिलेले चॅलेंज मस्क यांनी पूर्ण करून दाखवले. मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलून डॉगे का केला? यावर अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही. परंतु, असे म्हणता येईल की, मस्क हे केवळ डोगेकॉईन गुंतवणूकदारांकडून त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. डोगेचा लोगो बदलून, त्यांना हे सिद्ध करायचे होते की, डोगेबद्दलचे आपण केलेले ट्विट कोणाला फसवण्याचा प्रयत्न नव्हता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news