‌Biocon leadership change: ‘बायोकॉन‌’च्या साम्राज्याला मिळणार नवा वारसदार

किरण मजूमदार-शॉ यांची पुतणी क्लेयर सांभाळणार धुरा
‌Biocon leadership change
‌Biocon leadership change
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारतातील अग्रगण्य बायोटेक कंपनी ‌‘बायोकॉन‌’च्या संस्थापक आणि अध्यक्षा किरण मजूमदार-शॉ यांनी कंपनीच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली आहे. किरण मजूमदार-शॉ यांची 37 वर्षीय पुतणी क्लेयर मजूमदार आता या विशाल बायोटेक सामाज्याची कमान सांभाळणार आहेत.

क्लेयर यांची ओळख केवळ किरण मजूमदार-शॉ यांच्या नातेवाईक एवढीच मर्यादित नाही. त्यांनी एमआयटी आणि स्टॅनफोर्डसारख्या जगातील प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या नॅस्डॅकवर सूचिबद्ध असलेल्या ‌‘बिकारा थेरेप्यूटिक्स‌’ या कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. चार दशकांपूर्वी ‌‘बायोकॉन‌’ची पायाभरणी करणाऱ्या किरण मजूमदार-शॉ यांना स्वतःचे अपत्य नाही. ‌‘फॉर्च्यून इंडिया‌’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, कंपनी सुरक्षित आणि पात्र हातात जावी ही त्यांची प्राथमिकता होती. त्या म्हणाल्या, ‌‘मी माझ्या पुतणीमध्ये माझा उत्तराधिकारी पाहिला आहे.

कारण, तिने एक यशस्वी कंपनी चालवून स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे.‌’ ‌‘बायोकॉन‌’ने इनक्यूबेट केलेली क्लेयर यांची ‌‘बिकारा‌’ ही कंपनी 2024 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली असून, आज तिचे मार्केट कॅप 1.6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. किरण मजूमदार-शॉ या लगेचच निवृत्त होणार नाहीत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‌‘द‌’ (ट्विटर) वर स्पष्ट केले की, हा बदल अचानक न होता टप्प्याटप्प्याने होणार आहे. नेतृत्वात सातत्य आणि स्थिरता राहावी, यासाठी क्लेयर हळूहळू जबाबदाऱ्या स्वीकारतील.

कॅन्सर बायोलॉजीमध्ये पीएच.डी. केलेल्या क्लेयर यांनी बायोटेक क्षेत्रात मोठा अनुभव घेतला आहे. या प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाचीही तांत्रिक साथ लाभणार आहे : एरिक मजूमदार : क्लेयर यांचे भाऊ, जे ‌‘कॅलटेक‌’मध्ये प्राध्यापक आणि एआय तज्ज्ञ आहेत. थॉमस रॉबर्टस्‌‍: क्लेयर यांचे पती, जे मॅसॅच्युसेटस्‌‍ जनरल हॉस्पिटलमध्ये ऑन्कोलॉजिस्ट असून, कर्करोगावरील औषध निर्मितीत त्यांची तज्ज्ञता महत्त्वाची ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news