मूर्खपणामुळे घालवले एक अब्ज रुपये!

मूर्खपणामुळे घालवले एक अब्ज रुपये!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : 'दैव देते आणि कर्म नेते' असे म्हटले जाते. ही म्हण अनेकांच्या बाबतीत खरी ठरत असते. एका महिलेने 30 वर्षांपूर्वी असाच एक मूर्खपणा केला ज्यामुळे तिने 12 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1 अब्ज रुपये गमावले आणि संपूर्ण आयुष्य गरिबीत मुलांना सांभाळत घालवावं लागलं. एका 77 वर्षीय महिलेने तिच्या या मूर्खपणाबाबत सांगितलं आहे.

1984 मध्ये पती ब्रुनोच्या दुःखद मृत्यूनंतर न्यूयॉर्कच्या जेनेट व्हॅलेंटी आपल्या दोन मुलांचे केविन आणि जेनिफरचे संगोपन करण्यासाठी धडपडत होती. 17 जुलै 1991 रोजी त्यांनी ग्रॅनाइटविले येथे डेलिकेटसेन जेएनजे येथून 1 डॉलरमध्ये लॉटरीचे तिकीट विकत घेतले. त्याच दिवशी ती तिच्या मित्रासोबत वीकेंड घालवायला निघाली. दुसर्‍या दिवशी एका मैत्रिणीने तिला सांगितले की स्टेटन आयलंडमध्ये एक विनिंग तिकीट विकले गेले आहे. जेव्हा जेनेटने विजयी लॉटरी क्रमांक तपासला तेव्हा तिला कळले की तिने 12 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1 अब्ज रुपये जिंकले आहेत.

घरी जाऊन ती तिकीट शोधू लागली. तेव्हा तिला लक्षात आलं की बाहेर फिरायला जाताना तिने घाईघाईने घरातील कचर्‍यात ते तिकीट फेकून दिले. त्यानंतर तिने कचर्‍यात तिकीट शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाही. व्हॅलेंटीने स्टेटन आयलँड अ‍ॅडव्हान्सला सांगितले, माझ्या शेजार्‍याने, ज्याने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही तिचा कचरा फेकला नाही, त्याने दुसर्‍या दिवशी माझा कचरा फेकून दिला. यानंतर कचर्‍याच्या ट्रकने कचर्‍यासोबत माझं आयुष्य बदलणारे ते 1 अब्ज रुपयेही नेले. तिची चूक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हे सर्व ठीक होईल. परंतु तिला सांगण्यात आले की बक्षीस मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लॉटरी तिकीट आहे.

किरकोळ विक्रेत्याकडून तिकीट खरेदी करतानाच्या सीसीटीव्ही फुटेजचाही उपयोग होणार नसल्याचं त्यांना सांगण्यात आले. राज्य लॉटरी नियमांनुसार, विजेत्या तिकिटावर केवळ 17 जुलै 1992 पर्यंत, म्हणजेच खरेदीच्या एक वर्षापर्यंत दावा केला जाऊ शकतो. त्यावेळच्या राज्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दावा न केलेला लॉटरी बक्षीस असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news