चक्क बांबूपासून बनवली सायकल!

बांबूची सायकल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
Bicycle Built of Bamboo
बांबूपासून सायकल बनवली. Pudhari File Photo
Published on
Updated on

पाटणा : सायकल ही सर्वसामान्य माणसाची सवारी. सायकल म्हणजे स्वस्त आणि मस्त! ना पेट्रोल- डिझेलची झंझट, ना इंजिनची कटकट. हल्ली हवेचे प्रदूषण टाळणे आणि व्यायाम अशा दोन लाभांसाठी जगात अनेक ठिकाणी सायकलचा वापर वाढला आहे. चीन व नेदरलँड्ससारख्या देशामध्ये सायकल वापरणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. काळाच्या ओघात सायकलच्याही किमती वाढत गेल्या. पंधरा हजारांपासून ते अगदी लाखोंच्या सायकलीही सध्या बाजारात आहेत. त्यामुळे त्याही घेणं काही जणांसाठी कठीण आहे. बिहारमध्ये असाच एक तरुण आहे ज्याला सायकलची गरज होती; पण खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्याने असा काही जुगाड केला की त्याने पिझ्झा जेवढ्या किमतीत मिळतो तेवढ्या पैशात एक ‘देसी जुगाडू सायकल’ बनवून टाकली! ही सायकल चक्क बांबूची आहे.

Bicycle Built of Bamboo
जागतिक सायकल दिन विशेष | सायकली वाढल्या, मात्र चालवणार कुठे?

फक्त 500 रुपयांत बनवली ही सायकल

बिहारच्या समस्तीपूरमध्ये राहणार्‍या या तरुणाला सायकलची गरज होती; पण पुरेसे पैसे नव्हते. मग त्याने बांबूच्या सहाय्याने ही ‘इको फ्रेंडली’ सायकल बनवली. अमरेश कुशवाह नावाच्या एका तरुणाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते एका तरुणाबरोबर बोलताना दिसत आहेत. तो तरुण बांबूने बनवलेली सायकल चालवत आहे. या तरुणाने सांगितलं आहे की तो याच सायकलने आता प्रवास करतो. ही बांबूची सायकल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. जवळपास 1 लाख 68 हजार जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. त्याने केलेला हा जुगाड सर्वांना पसंत पडला आहे. समस्तीपूरच्या या तरुणाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे सर्वात स्वस्त सायकलही तो खरेदी करू शकत नव्हता. त्यावर त्याने एक भन्नाट उपाय शोधून काढला. त्याने बांबूच्या सहाय्याने फक्त 500 रुपयांत ही सायकल बनवली आहे. एक पिझ्झा जेवढ्या किमतीला मिळतो तेवढ्या किमतीत त्याने सायकल बनवली आहे. ही सायकल बनवण्यासाठी त्याला 25 दिवस लागले. 15 ऑगस्टपासून तो ही सायकल वापरत आहे. या सायकलवरूनच तो आपली रोजची कामेही करतो. सध्या त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Bicycle Built of Bamboo
Cycling : नियमित सायकल चालवल्याने ‘हे’ होतात लाभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news