Cycling : नियमित सायकल चालवल्याने ‘हे’ होतात लाभ

सायकल चालवणे आरोग्यासाठी लाभदायक
Cycling is beneficial for health and fitness
सायकल चालवणे आरोग्यासाठी लाभदायक.Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : चीन, नेदरलँडस्सारख्या अनेक देशांमध्ये सध्या सायकल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. जीवाश्म इंधनावर चालणार्‍या वाहनांऐवजी सायकल वापरल्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होतेच; शिवाय आरोग्यालाही अनेक प्रकारचे लाभ मिळतात. त्याबाबतची ही माहिती...

लॉकडाऊनच्या काळात बनवली लाकडी सायकल!

दररोज सायकल चालवल्याने शरीरातील चरबी घटते

दररोज सायकल चालवल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी घटते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. दिवसाची सुरुवात ही सायकल चालवण्यापासून करणे लाभदायकच ठरते. नियमितपणे सायकल चालवल्यास शरीर तंदुरुस्त राहते. त्याचबरोबर खांदे व पायाचे स्नायू मजबूत होतात. दररोज सायकल चालवल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते व हृदयविकाराचा धोका कमी होतो. सायकल चालवल्यामुळे ताणतणाव, नैराश्य यातून सुटका होते व मानसिक आरोग्य सुधारते. अशा व्यायामाने आपल्या शरीरातील हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडतात आणि मूड सुधारण्यास मदत होते. तसेच, सायकल चालवल्यामुळे चांगली झोपदेखील येते. नियमित सायकल चालवल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. दररोज सायकल चालवल्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात.

बाप तो बापच… लेकाच्‍या औषधांसाठी चालवली तब्‍बल ३०० किलोमीटर सायकल  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news