अस्वलाने काढले 400 सेल्फी फोटो!

अस्वलाने काढले 400 सेल्फी फोटो!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील बोल्डर या खडकाळ पर्वतरांगांमध्ये एका जंगली अस्वलाने अलीकडेच एक कॅमेरा हॅक केला होता. सुरुवातीला कुतुहल म्हणून कदाचित तो कॅमेरा बघत असावा; पण जेव्हा ते अस्वल निघून गेल्यावर फोटोग्राफरने कॅमेरा तपासला तेव्हा त्यात असे काही सापडले की सगळेच थक्क झाले. या अस्वलाने चक्क 400 सेल्फी फोटो काढले होते. बोल्डर ओपन स्पेस अँड माऊंटन पार्क्स प्रशासनाने अलीकडेच या अस्वलाने कॅमेर्‍यांवर घेतलेले "सेल्फी" शेअर केले आहेत. ही छायाचित्रे नोव्हेंबर 2022 ला घेण्यात आली होती. त्यानंतर 24 जानेवारीला हे फोटो शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांना या अस्वलाच्या जबरदस्त पोझची सुद्धा भुरळ पडली आहे.

या फोटोवर अनेक ट्विटर यूजर्सनी कमेंट केल्या आहेत, एक यूजर म्हणतो की "मला माहीत आहे की अस्वल हे भले मोठे दात आणि नखे असलेला आक्रमक प्राणी आहे, जो धावू शकतो, पोहू शकतो आणि तुमचा चेहरा अगदी बिघडवून ठेवू शकतो. पण या सेल्फी पाहून अस्वल किती स्मार्ट आणि गंमतशीर आहे याचाही अंदाज येतो." तर दुसरा एक यूजर म्हणतो की, "अस्वल आता वन्यजीव मासिकाच्या कव्हर पेजवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे." 'ओएसएमपी'ने 46,000 एकरमध्ये नऊ कॅमेरे बसवले आहेत.

वन्यजीव कॅमेरे बसवण्याच्या महत्त्वाविषयी बोलताना, 'ओएसएमपी'चे वरिष्ठ वन्यजीव पर्यावरणशास्त्रज्ञ विल केली म्हणाले, "मोशन-डिटेक्टिंग कॅमेरे आम्हाला स्थानिक प्रजाती आपल्या सभोवतालच्या लँडस्केपचा कसा वापर करतात याबद्दल अधिक जाणून घेण्याची एक अनोखी संधी देतात. हे कॅमेरे 'ओएसएमपी' कर्मचार्‍यांना महत्त्वाचे वन्यजीव क्षेत्र ओळखण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आम्ही त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती संवेदनशील नैसर्गिक क्षेत्रांचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी निवासस्थान-संरक्षणात्मक उपायांची शिफारस करण्यासाठी वापरतो. हे कॅमेरे त्यांच्या समोरील हालचाल जाणवल्यावर फोटो क्लिक करू शकतात. रात्रीच्या वेळी कॅमेरे निशाचर प्राण्यांना त्रास न देता फोटो टिपण्यासाठी इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news