खगोल शास्त्रज्ञांनी लावला बाह्यग्रहाचा शोध

खगोल शास्त्रज्ञांनी लावला बाह्यग्रहाचा शोध

मेलबोर्न : अंतराळाबाबत संशोधन करणारे शास्त्रज्ञ पृथ्वीसारखा दुसरा कोणताही ग्रह आहे का? तेथे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी एलियन्सचाही अनेक वेळा उल्लेख केला जातो. याबरोबच इतर ग्रहांवरील जीवनाच्या शक्यतेची पडताळणी केली जाते. असे करत असताना शास्त्रज्ञांना कधी कधी आश्चर्यकारक घटनांबाबत माहिती मिळत असते. अशाच एका प्रयत्नात खगोल शास्त्रज्ञांनी नव्या बाह्यग्रहाचा शोध लावला आहे.

'युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड'ने सादर केलेल्या अहवालात या बाह्यग्रहाबाबत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ग्रहाला स्वत:चा ताराही आहे. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बाह्यग्रहाला कखझ 99770ल असे नाव देण्यात आले आहे. डॉ. क्युरी यांच्या नेतृत्वाखालील पथकानेे डायरेक्ट इमेजिंग तंत्राचा वापर करून बाह्यग्रह आणि त्याच्या तार्‍याचे छायाचित्र तयार केले आहे.

संशोधक व डॉक्टर सायमन मर्फी यांनी कखझ 99770ल ची तपशीलवार प्रतिमा तयार करण्यात मदत केली; पण हे खूप अवघड काम होते. कारण, हा बाह्यग्रह त्याच्या तार्‍याच्या तेजात कुठेतरी हरवत होता. बाह्यग्रहाचा वेग पाहून खगोलशास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले. डॉ. मर्फी यांनी सांगितले की, डायरेक्ट इमेजिंग तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे काम करते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आतापर्यंत 20 बाह्यग्रहांचा शोध लावण्यात आला आहे. डॉ. थेइन क्युरी यांनी सांगितले की, डायरेक्ट इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने खगोलशास्त्रज्ञ बाह्यग्रहाचे वातावरण, त्याचे वजन आणि त्याच्या कक्षेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात. भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीसारखा बाह्यग्रह शोधला जाऊ शकतो, असा विश्वास आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news