सारे काही तिला खाताना पाहण्यासाठी!

सारे काही तिला खाताना पाहण्यासाठी!
Published on
Updated on

लंडन : पैसे कमावण्यासाठी जगभरात लोक वेगवेगळे मार्ग शोधतात. काही जण उत्तम शिक्षण घेऊन नोकरी करतात व त्यातून पैसे कमावतात. काही लोक व्यवसायाचा मार्ग स्वीकारतात, तर काही मात्र चौकटीबाहेरचे पर्याय शोधत या ना त्या प्रकारे अमाप पैसा कमवत राहतात. 19 वर्षांची एप्रिल ओपल ही कन्या याच प्रकारात मोडणारी असून, पुरुषांच्या निव्वळ वेडेपणाचा लाभ घेत केवळ आपण काहीही खात असल्याचे व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडून पैसे वसूल करते. या एकाच उत्पन्न स्रोताच्या माध्यमातून ती चक्क कोट्यधीश झाली आहे.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, 19 वर्षीय एप्रिल ओपल ही कन्या या छोट्या वयातही आपले साम्राज्य उभे करण्यात कमालीची यशस्वी झाली. एप्रिल ओपलने ऑक्सफर्डमधील आपले शिक्षण अर्ध्यावर सोडले आणि श्रीमंत होण्याचे लक्ष्य समोर ठेवून ओन्ली फॅन्स नावाची साईट जॉईन केली. या साईटवर लोक कंटेंट विकून कमाई करतात.

एप्रिल ओपल ही पुरुषांच्या विनंतीनुसार कधी मॅकडोनाल्डचे बिग साईज मिल खाऊन, तर कधी बर्गर खाऊन त्याचे व्हिडीओ त्यांना पाठवते व पैसे मिळवते. असे व्हिडीओ पाठवण्यासाठी ती किमान 30 हजार रुपये घेते. ओपलशी संपर्क साधणारे पुरुष बर्‍याचदा आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांची डिश तिच्या नावाने ऑर्डर करतात आणि ती डिश खात असताना आपले नाव घेण्याची विनंती करतात. एप्रिल ओपल कोट्यधीश झाली, त्याचे श्रेय पुरुषांच्या अशा या वेडेपणालाच जाते!

वर्षभराची कमाई कोटीच्या घरात!

एप्रिलने दिलेल्या माहितीनुसार, ती या अनोख्या कामातून महिन्याला 30 लाख रुपये तर वर्षाकाठी 3 कोटी 60 लाख रुपयांच्या आसपास कमाई करते. एप्रिल ओपलचे ऑस्ट्रेलियात सुटी व्यतीत करायचे स्वप्न होते. ते तिने टीनेजमधून बाहेर येण्यापूर्वीच पूर्ण केले आहे. या अनोख्या क्षेत्रात उतरण्यापूर्वी तिला स्टेम सेल रिसर्चर व्हायचे होते. पण, या क्षेत्रातही आपण समाधानी असल्याचे ती आवर्जून सांगते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news