

नवी दिल्ली : आजच्या युगात, जे दिसते ते सत्य आहे, असे समजणे अत्यंत धोकादायक आहे. हल्ली फोटो इतके कुशलतेने एडिट केले जाऊ शकतात की, मोठ्या कंपन्यांमधील बुद्धिमान लोक, डॉक्टरदेखील सहजपणे फसले जाऊ शकतात. सोशल मीडियावर अशीच एक गोष्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका कर्मचार्याने एआय तंत्रज्ञान वापरून त्याच्या हातावर जखम निर्माण केली आणि मेडिकल लिव्ह घेतली. विशेष म्हणजे हा फोटो एआय जनरेटेड आहे, हे कोणालाच समजले नाही.
ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोस्टनुसार, कर्मचार्याने त्याच्या हाताचा स्पष्ट फोटो काढला. तिथे कोणतीही जखम नव्हती, सूज नव्हती, रक्त नव्हते. त्यानंतर त्याने जेमिनी नॅनोसारख्या एआय टूलमध्ये फक्त अिश्रिू रप ळपर्क्षीीू ेप ाू हरपव असा प्रॉम्प्ट त्याने दिला. काही सेकंदात, एआयने त्याच्या हातावर अशी जखम निर्माण केली की, कोणालाही ती खरी जखम वाटेल.
कर्मचार्याने हा फोटो एचआरला पाठवला आणि दावा केला की, तो बाईकवरून पडला आहे. एचआरने कोणतीही चौकशी न करता सुट्टी मंजूर केली. त्याला दुसरे कोणतेही प्रश्न विचारले गेले नाहीत किंवा मेडिकल सर्टिफिकेट मागितले नाही. एचआरला हा फोटो बनावट आहे, याची कल्पना नव्हती. सोशल मीडियावर ही पोस्ट पाहिल्यानंतर, लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.