

मुंबई : मोबाईल ब्रॉडबँड नेटवर्कवर अवलंबून न राहता थेट मोबाईलवर व्हिडीओ, डेटा आणि ओटीटी सेवा मिळवण्याचे डायरेक्ट-टू-मोबाईल (डी टू एम) तंत्रज्ञान भारतात मोठी क्रांती घडवण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. प्रसार भारतीने सध्याच्या पायाभूत सुविधा आणि दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल टॉवर्सचा वापर करून हे अत्याधुनिक 2 तंत्रज्ञान उपकरणे देशभर तयार करण्याची योजना आखली आहे. यामुळे साध्या मोबाईल फोनमध्ये डेटा विनाच लाईव्ह काँटेंट, ओटीटी स्ट्रीमिंकसारखा अनुभव सहजगत्या घेता येणार आहे.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञाच्या अंदाजानुसार, देशभरात 2 नेटवर्क सुरू करण्यासाठी सुमारे 28,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आवश्यक असेल. ग्राहकांच्या वाढीनुसार ही गुंतवणूक पुढील टप्प्यात वाढवली जाऊ शकते. या सेवेसाठी प्रसार भारतीला देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करणे शक्य आहे. या विशेष तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्कवर अवलंबून न राहता थेट मोबाईलवर कंटेंट उपलब्ध होईल. त्यामुळे डेटा वापर कमी होईल आणि परिणामी, दूरसंचार कंपन्यांचे डेटा उत्पन्न घटू शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे. यामुळे दूरसंचार कंपन्या 2 तंत्रज्ञानाविरुद्ध सावध भूमिका घेत आहेत आणि अशा सेवांसाठी बाजारभावाने स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. द इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहेत.
या तंत्रज्ञानाच्या चाचण्या सध्या दिल्ली आणि बंगळूर येथे घेण्यात आल्या आहेत. पुढील 6 ते 9 महिन्यांत 19 शहरांमध्ये प्रसार भारतीच्या पायाभूत सुविधांचा वापर करून व्यावसायिक चाचण्या सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतात आणले जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे.
सध्या फोन उत्पादन क्षेत्रातील दोन कंपन्या पुढे आल्याने प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. फीचर फोनचे प्रोटो-टाईप तयार आहेत आणि देशभरात सेवा उपलब्ध झाल्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होऊ शकते, असे मत उद्योजक गौतम धिंग्रा यांनी व्यक्त केले. एका फोन उत्पादक कंपनीचे सीएमओ संजीव अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही 2000 ते 2200 च्या श्रेणीत सहा महिन्यांच्या कालावधीत फीचर फोन मॉडेल बाजारात आणण्यासाठी तयारी करत आहोत.